Loujain al Hathloul ची तुरूंगातून सुटका, १००१ दिवस जबरदस्ती किस आणि रेपसाठी पाडलं भाग....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 04:05 PM2021-02-11T16:05:23+5:302021-02-11T16:11:28+5:30
Loujain Al Hathloul Saudi Activist Realesed: ३ वर्षांपर्यंत सौदी अरेबियातील(Saudi Arab) तुरूंगात चौकशी दरम्यान लोजैन-अल-हथलाउलला चौकशी करणाऱ्यांना जबरदस्ती किस करणे आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं.
Loujain Al Hathloul Saudi Activist Realesed: सौदी अरबच्या तुरूंगातून १००१ दिवसांनंतर महिला सामाजिक कार्यकर्त्या लोजैन-अल-हथलाउलला सोडण्यात आलं आहे. आरोपांनुसार, ३ वर्षांपर्यंत तुरूंगात चौकशी दरम्यान लोजैन-अल-हथलाउलला चौकशी करणाऱ्यांना जबरदस्ती किस करणे आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं. चला जाणून घेऊ कोण आहे ही लोजैन-अल-हथलाउल कोण आहे?
बुधवारी सौदी अरबची प्रमुख महिला सामाजिक कार्यकर्ती लोजैन-अल-हथलाउल (Loujain al Hathloul)हिला तुरूंगातून सोडण्यात आलं. आरोपांनुसार, तिच्यासोबत ३ वर्षे तुरुंगात रेप केला गेला आणि अनेक लोकांनी तिचं लैंगिक शोषण(Sexual Harassment) केलं.
किस करण्यासाठी पाडलं भाग
याआधी ह्यूमन राइट्स वकील बॅरोनेस हेलेना कॅनेडीने पत्र लिहून सांगितलं होतं की सौदी अरबच्या तुरूंगात लोजैन-अल-हथलाउलसोबत अनेकदा रेप करण्यात आला. लोजैन-अल-हथलाउल (Loujain al Hathloul) ला चौकशी करणाऱ्यांना किस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. चौकशी दरम्यान लोजैन-अल-हथलाउलसोबत रेपही करण्यात आला.
दाखवले गेले अश्लील सिनेमे
बॅरोनेस हेलेना कॅनेडीच्या आरोपानुसार लोजैन-अल-हथलाउल (Loujain al Hathloul) ला चौकशी दरम्यान अश्लील सिनेमे दाखवले गेले. रेपची धमकी दिली गेली. छताला दोरी बांधून लटकवलं गेलं, निर्दयीपणे मारण्यात आलं आमि अनेकदा इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले.
महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार देण्यात महत्वाची भूमिका
लोजैन-अल-हथलाउल (Loujain al Hathloul) हिनेच सौदी अरबमध्ये महिलांना कार ड्राइव्ह करण्याचा अधिकार देण्याचा लढा लढला. सौदी अरबमध्ये लोजैन-अल-हथलाउलला २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. कोर्टाने तिला ६ वर्षांची शिक्षा सुनावली होती.
किंगडम विरोधात उठवला होता आवाज
दरम्यान लोजैल-अल-हथलाउल (Loujain al Hathloul) न अनेकदा सौदी (Saudi Arab) किंगडमवर टीका केली आहे. त्यांनी विचारले होते की, पुरूषांशिवाय सौदी अरबमधील महिला घराबाहेर का पडू शकत नाहीत? लोजैन-अल-हथलाउलने पहिल्यांदा २०१४ मध्ये सौदी अरबच्या महिला विरोधा कायद्यांविरोधात आवाज उठवला. यानंतर लोजैन-अल-हथलाउलने संयुक्त अरब अमीरातमध्ये कार ड्राइव्ह केली आणि त्याचा व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम केला.