Pakistan Financial crisis: 'बुडत्या' पाकिस्तानला  Saudi Arabia चा आधार... दिवाळखोर होण्यापासून वाचवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 02:31 PM2023-01-10T14:31:21+5:302023-01-10T14:32:16+5:30

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची मोठी घोषणा

Saudi Arabia Prince big announcement for Pakistan facing economic crisis on the verge of bankruptcy | Pakistan Financial crisis: 'बुडत्या' पाकिस्तानला  Saudi Arabia चा आधार... दिवाळखोर होण्यापासून वाचवणार?

Pakistan Financial crisis: 'बुडत्या' पाकिस्तानला  Saudi Arabia चा आधार... दिवाळखोर होण्यापासून वाचवणार?

googlenewsNext

Pakistan Financial Crisis, Saudi Arabia: आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानलासौदी अरेबियाने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानमधील त्यांची गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. अधिकृत सौदी वृत्तसंस्थेनुसार, क्राउन प्रिन्स सलमान यांनी सौदी डेव्हलपमेंट फंडला पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेतील सौदीच्या ठेवींची रक्कम पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याबाबत अभ्यास करण्यास सांगितले आहे.

सौदी अरेबियाकडून याआधीही ऑगस्ट २०२२ मध्ये पाकिस्तानमध्ये अशा गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्येही सौदी अरेबियाने सेंट्रल बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत वाढ करण्यात आली. पण असे असले तरी पाकिस्तान आता पुन्हा एकदा डिफॉल्टच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तेथे परकीय चलनाचा साठा ५ अब्ज डॉलरच्याही खाली पोहोचला असून, त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला आणि पाकिस्तानच्या लोकांना मदत करण्यासाठी सौदी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानला डिफॉल्टपासून वाचवण्याचा प्रयत्न सौदी अरेबियाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांनी असे केले आहे. पाकिस्तान अनेक दिवसांपासून सौदीकडून मदतीची वाट पाहत होता. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी नुकतेच सांगितले होते की, सौदी अरेबियातून लवकरच पैसा येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी वर्षभरात दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली होती. अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही सौदी अरेबियाला भेट दिली होती. सौदी अरेबियाकडून आर्थिक मदत मिळावी हा या भेटींचा उद्देश होता. त्यानुसार आता हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. सौदी प्रेस एजन्सीने मंगळवारी सांगितले की, प्रिन्स मोहम्मद यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि तेथील लोकांना मदत करण्यासाठी हे निर्देश दिले आहेत.

Web Title: Saudi Arabia Prince big announcement for Pakistan facing economic crisis on the verge of bankruptcy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.