सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:22 AM2023-12-31T09:22:58+5:302023-12-31T09:23:17+5:30
कच्चे तेल आणि सोने यांना जगात मोठी मागणी आहे. अशातच दोन्ही गोष्टी सौदीच्या हाती असल्याने पुन्हा एकदा सौदीच जगावर राज्य करणार आहे.
कच्च्या तेलानंतर आखाती देशाना पुढे कायचे प्रश्न पडले होते. यामुळे सौदी अरेबियासारख्या देशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न चालविले होते. अशातच सौदीचे नशीब फळफळले आहे. तेलाचा साठे संपत चाललेले असताना सौदीच्या प्रसिद्ध मक्केमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे मिळाले आहेत.
कच्चे तेल आणि सोने यांना जगात मोठी मागणी आहे. अशातच दोन्ही गोष्टी सौदीच्या हाती असल्याने पुन्हा एकदा सौदीच जगावर राज्य करणार आहे. सौदीच्या मंसुराह मस्सारा मध्ये जवळपास १०० किमी भागात पसरलेला सोन्याचा साठा मिळाला आहे. मादेन या मायनिंग कंपनीने याची माहिती दिली आहे.
२०२२ मध्ये या भागात खनिज उत्खननासाठी कंपनीने शोध सुरु केला होता. यामध्ये मातीच्या परिक्षणात मस्सारापासून ४०० मीटरच्या अंतरावर जमिनीमध्ये दोन रँडम ड्रील करण्यात आले होते. या मातीतून 10.4 ग्राम प्रति टन (जी/टी) सोने आणि 20.6 ग्राम/टी सोने असे दोन उच्च श्रेणीतील सोन्याचे भांडार सापडले आहेत. यामुळे कंपनीने या भागात आजुबाजुला आणखी शोध घेण्याची योजना तयार केली आहे.
कंपनीने फॉस्फेट आणि सोन्याच्या उत्पादनाला दुप्पट करणार आहे. सौदीला कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करायचे आहे. यासाठी क्राऊन प्रिन्स सलमानने व्हिजन २०३० कायक्रम राबविला आहे. याचाच हा भाग असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.