लिओनार्दो दा विंचींचे चित्र खरेदी करणाऱ्या राजपूत्राचा अखेर शोध लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 03:17 PM2017-12-08T15:17:26+5:302017-12-08T15:27:08+5:30
लिओनार्दोच्या ५०० वर्ष जुन्या फोटोच्या लिलावात तब्बल ३००० कोटी रुपयाची किंमत देणारा व्यक्ती इतके दिवस पडद्याआड होता.
सौदी : गेल्या महिन्यात लिओनार्दो दा विंचींच्या ५०० वर्षे जुने असलेल्या चित्राविषयी चर्चा रंगली होती. ५०० वर्षे जुनं चित्र तब्बल ३ हजार कोटी रुपयांना विकलं गेल्यामुळे हे चित्र चर्चेत आलं होतं. पण हे चित्र नक्की कोणी विकत घेतलं होतं, याविषयी गुप्तता पाळण्यात आली होती. पण आता हे चित्र कोणी विकत घेतलंय याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा - लिओनार्दो दा विंचीच्या मोनालिसाच्या नग्न चित्राने खळबळ
लिओनार्दो दा विंचींच्या या चित्राचं नाव आहे साल्वाडोर मुंडी. ते ख्रिस्तांचं चित्र होतं. हे चित्र खरेदी करणारा माणूस हा सौदीचा एक राजपुत्र असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाईम्सने दिलं आहे. या राजपुत्राचं नाव बागेर बीन मोहम्द बीन फरहान अल सौद आहे. नोव्हेंबर महिन्यात साल्वाडोर मुंडी या चित्राचा लिलाव पार पडला. लिलावात अनेकांनी मोठ मोठ्या किंमती सांगितल्या होत्या. १९ मिनिटं चाललेल्या या लिलावात शेवटी एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने सगळ्यात जास्त बोली लावून हे चित्र विकत घेतलं. या चित्राची किंमत एखाद्या विमानाएवढी असल्याने प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे हे चित्र खरेदी करणारा नेमका कोण आहे? तो किती अब्जावधी आहे? की कोणत्या देशाचा राजा वैगरे आहे का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे हे चित्र नक्की कोणी विकत घेतलंय याविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले होते.
Da Vinci's Salvator Mundi is coming to #LouvreAbuDhabipic.twitter.com/Zdstx6YFZG
— Louvre Abu Dhabi (@LouvreAbuDhabi) December 6, 2017
हे चित्र विकत घेणारा खरेदीदार सौदीचा राजपूत्र आहे. या राजपूत्राने हे चित्र खरेदी केल्यानेही अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. कारण या राजपूत्राला चित्रांचा किंवा अशा दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद असल्याचं कुणाच्याही ऐकीवात नाही. तसंच या राजपूत्राकडे किंवा त्याच्या कुटुंबाकडे अमाप संपत्ती असल्याचेही पुरावे नाहीत. इतकंच नव्हे तर या चित्राची किंमत हा राजपुत्र सहा महिन्याच्या कालावधीत हप्ते स्वरुपात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही समोर आले आहे.
आबू धाबीमध्ये नुकतंच एक नवी वास्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आलं आहे. लॉर्वे असं या वास्तुसंग्रहालयाचं नाव असून तिथे हा फोटो ठेवण्यात येणार असल्याचं ट्विट या वास्तुसंग्रहालयाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.