सौदी अरेबिया घडवणार इतिहास! ९ मे रोजी पहिली महिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार, कोण आहे 'रायना बर्नवी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:25 PM2023-04-07T17:25:53+5:302023-04-07T17:26:45+5:30

Rayyanah Barnawi: रायना बर्नवी या स्तनाच्या कर्करोग संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. अंतराळात जाणारी त्या पहिली सौदी महिला ठरणार आहेत. त्या फायटर पायलट अली अल-कर्नी यांच्यासोबत त्या सामील होणार आहेत.

saudi first female astronaut rayyanah barnawi will fly for space may 9 | सौदी अरेबिया घडवणार इतिहास! ९ मे रोजी पहिली महिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार, कोण आहे 'रायना बर्नवी'?

सौदी अरेबिया घडवणार इतिहास! ९ मे रोजी पहिली महिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार, कोण आहे 'रायना बर्नवी'?

googlenewsNext

सौदी अरेबिया पुन्हा एकदा नवा इतिहास घडवणार आहे. सौदी आपली पहिली महिला अंतराळवीर रायना बर्नावीला अंतराळात पाठवणार आहे. भारतीय वेळेनुसार ९ मे रोजी रायना सौदी अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी नासा आणि अ‍ॅक्सिओम स्पेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. रायना बर्नावी आणि तिचा साथीदार अल-कर्नी एका खासगी मोहिमेवर अमेरिकेतील फ्लोरिडा येथून ISS साठी उड्डाण करतील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रायना बर्नावीची ओळख ब्रेस्ट कॅन्सर संशोधक म्हणून आहे. अंतराळात जाणारी ती पहिली सौदी महिला असेल. फायटर पायलट अली अल-कर्नी यांच्यासोबत त्या मोहिमेत सामील होणार आहेत. आणखी दोन अंतराळवीर खासगी मोहिमेचा भाग आहेत. ज्यात माजी NASA अंतराळवीर पेगी व्हिटसन आणि व्यावसायिक जॉन शॉफनर आहेत, जे पायलट म्हणून या मोहिमेचा भाग असतील.

विशेष म्हणजे, सौदी अरेबियाने नुकतंच आपल्या अंतराळवीरांपैकी एक सुलतान अल नेयादी याला अंतराळात पाठवलं आहे, जो रमजानच्या पवित्र महिन्यात ISS वर आपलं कर्तव्य बजावत आहे. चार अंतराळवीर ९ मे रोजी ISS वर अल नेयादीमध्ये सामील होतील आणि खासगी मिशनसाठी रवाना होतील.

स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल चार अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी सज्ज आहे. SpaceX, NASA आणि Axiom Space मिळून मिशन पूर्ण करतील. Axiom Space ही अमेरिकेची स्पेस कंपनी आहे, या कंपनीचे हे दुसरं स्पेस मिशन आहे. रायना बर्नावी ISS च्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहेत. सौदी अरेबियाच्या प्रसारमाध्यमांच्या मते, त्यांच्या या भेटीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाची उद्दिष्टे पूर्ण होतील.

सौदी अरेबिया अंतराळ क्षेत्रात वेगाने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी सौदी सरकारनं अमेरिकेसोबत आर्टेमिस करारही केला होता. करारात सामील झाल्यानंतर अमेरिका आणि सौदी अरेबिया एकत्रितपणे अवकाशातील अनिश्चितता कमी करतील आणि अंतराळ ऑपरेशन्सची सुरक्षा वाढवतील.

Web Title: saudi first female astronaut rayyanah barnawi will fly for space may 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.