सौदी सरकारला वाटतेय, ७0 वर्षे टिकणार तेलसाठे
By admin | Published: October 14, 2016 01:16 AM2016-10-14T01:16:25+5:302016-10-14T01:16:25+5:30
सौदी अरेबियामध्ये अजूनही २६६.५ अब्ज बॅरल तेलाचे साठे असून, येणाऱ्या ७0 वर्षांपेक्षाही जास्त काळ हे साठे टिकतील, असे या देशाच्या सरकारला
दुबई : सौदी अरेबियामध्ये अजूनही २६६.५ अब्ज बॅरल तेलाचे साठे असून, येणाऱ्या ७0 वर्षांपेक्षाही जास्त काळ हे साठे टिकतील, असे या देशाच्या सरकारला वाटते.
‘ब्लूमवर्ग न्यूज’ने ही बातमी दिली. सौदी अरेबिया हा जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश आहे. सौदीची संपूर्ण अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या विक्रीवरच उभी आहे. सौदीच्या एकूण निर्यातीत तेलाचा वाटा ७५ टक्के आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सौदीने १0 अब्ज डॉलरचे रोखे विकण्याचा निर्णय घेतला. ५ वर्षे, १0 वर्षे व ३0 वर्षे मुदतीचे हे रोखे आहेत. त्यासाठी लंडन, लॉस एंजेलिस, बोस्टन व न्यू यॉर्कमध्ये सौदी सरकारकडून गुंतवणूकदारांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. बुधवारी त्यांना सुरुवातही झाली. सौदी सरकारच्या मालकीच्या सौदी अरेबियन आॅइल कंपनीमधील काही हिस्सेदारीही विकली जाणार आहे. (वृत्तसंस्था)