सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, यमन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर झालं क्रॅश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 08:14 AM2017-11-06T08:14:03+5:302017-11-06T08:14:53+5:30

 सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचा  हेलिकॉप्टर अपघातात मुत्यू झाला आहे.

saudi prince mansour bin moqren killed in helicopter crash near yemen border | सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, यमन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर झालं क्रॅश

सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, यमन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर झालं क्रॅश

Next
ठळक मुद्दे सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचा  हेलिकॉप्टर अपघातात मुत्यू झाला आहे. मन बॉर्डरवर त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं.

रियाध-  सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचा  हेलिकॉप्टर अपघातात मुत्यू झाला आहे. स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार यमन बॉर्डरवर त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात अन्य आधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन असीर प्रांतांचे डेप्युटी गव्हर्नर होते. सौदीच्या माजी क्राऊन प्रिन्सचे ते पुत्र होते. राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं क्रॅश झालं याबद्दलचं कारण अजून समोर आलेलं नाही. हेलिकॉप्टरमध्ये राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांच्याबरोबर जितकी लोक होती त्यांचाही मृत्यू झाला आहे.

रविवारी सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये ट्विटर, अ‍ॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. शक्तिशाली नॅशनल गार्डसचे प्रमुख, वित्तमंत्री व इतर बड्या पदाधिकाºयांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर  सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं वृत्त आलं आहे. 

Web Title: saudi prince mansour bin moqren killed in helicopter crash near yemen border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.