सौदीत नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या शाळांवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 04:58 PM2016-11-14T16:58:57+5:302016-11-14T16:58:57+5:30
सौदी अरेबियातील शिक्षण मंत्रालयाने नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या आंतरराष्ट्रीय शाळांवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 14 - सौदी अरेबियातील शिक्षण मंत्रालयाने नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या आंतरराष्ट्रीय शाळांवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.
एका वृत्त एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील शिक्षण मंत्रालयाने नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या आंतरराष्ट्रीय शाळांवर बंदी घालण्यात येणार आहे. यामध्ये नॉन-इस्लामिक म्हणजे ख्रिसमस आणि न्यू इयरला सुट्या, तसेच त्यांच्याच चौकटीत राहून परिक्षेत बदल करणा-या शाळांवर बंदी घालण्यात येईल, अशा इशारा दिला आहे. तसेच सौदीतील सर्व शाळांमध्ये सुट्या आणि परिक्षा यासंदर्भातील शैक्षणिक कॅलेंडर लावण्याचे आदेशही शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. याचबरोबर शाळांनी नियम तोडल्यास त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
सौयी अरेबिया हा सुन्नी-पुराणमतवादी लोकांचा प्रांत असून याठिकाणी सर्वांनी इस्लामिकचे नियम पाळले पाहिजे.