इस्रायलने युद्धभूमीवर उतरवला 'शत्रूंचा कर्दनकाळ'! Sayeret Matkal वर दिली खास जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:57 PM2023-10-13T23:57:09+5:302023-10-13T23:57:55+5:30

Israel Hamas War, Sayeret Matkal: बॉम्बहल्ले न थांबवल्यास इस्रायली नागरिकांना मारून टाकण्याची हमासने धमकी दिल्यावर स्पेशल फोर्स उतरवण्याचा घेतला निर्णय

sayeret matkal israels top of the spear preps for hostage rescue hamas war latest update | इस्रायलने युद्धभूमीवर उतरवला 'शत्रूंचा कर्दनकाळ'! Sayeret Matkal वर दिली खास जबाबदारी

इस्रायलने युद्धभूमीवर उतरवला 'शत्रूंचा कर्दनकाळ'! Sayeret Matkal वर दिली खास जबाबदारी

Israel Hamas War, Sayeret Matkal: हमासने इस्रायलवर हवाईहल्ले केल्यापासून दोघांमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरण आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलचे अनेक नागरिक ओलीस ठेवले असून त्यांच्या सुटकेसाठी इस्रायलचे प्रयत्न सुरी आहेत. अशा स्थितीत आता इस्रायलच्या 'सायरेत मतकल' या विशेष युनिटच्या शक्तीची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे इस्रायलच्या युनिटची यशस्वी होण्याची टक्केवारी १०० टक्के आहे. इस्रायलचा इतिहास काढून पाहिला तर हा देश कधीही घाबरलेला नाही किंवा मागे हटलेला नाही. त्यातच आता इस्रायलचे 'सायरेत मतकल' युनिट युद्धात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज झाले आहे.

इस्रायल भारताच्या केरळ राज्यापेक्षा आकाराने लहान आहे, परंतु ते नेहमीच आपल्या शत्रूंबद्दल कठोर राहिले आहे. त्याचे सर्व शेजारी देश हे मुस्लिम आहेत. त्यापैकी बहुतेक इस्रायलचे कट्टर शत्रू आहेत, जे त्यावर हल्ला करण्याची वाट पाहत आहेत. पण इस्रायलच्या एजन्सी हजारो किलोमीटर दूर बसून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि संधी मिळताच शत्रूचा नाश करतात.

7 ऑक्टोबरपासून इस्रायली लष्कर गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक करत आहे. हमासचे एक हजाराहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. इस्रायल आता गाझामध्ये त्याच प्रकारची कारवाई करत आहे, ज्याचा त्यांचा यशस्वी इतिहास आहे. म्हणजेच आता घरात घुसून शत्रूला मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हमासने शेकडो इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलने बॉम्बफेक थांबवली नाही तर ओलिसांना मारले जाईल, असे हमासने म्हटले आहे. पण हमासच्या धमकीनंतर इस्रायल आता ओलिसांची सुटका करण्यासाठी आपले विशेष युनिट 'सायरेत मतकल' मैदानात उतरणार आहे.

इस्रायलची सायरेत मतकल ही जगातील सर्वात धोकादायक स्पेशल फोर्स मानली जाते. सायरेत मतकलच्या खतरनाक कमांडोंनी अशा अनेक कारवाया केल्या आहेत, ज्यामुळे या इस्रायली सैन्याची ताकद जगाने ओळखली आहे.

सायरेत मतकल फोर्सचे कमांडो कमीत कमी वेळात सर्वात कठीण ऑपरेशन पूर्ण करतात. धोकादायक शस्त्रांनी सज्ज असलेला प्रत्येक कमांडो शत्रूसाठी कर्दनकाळ मानला जातो. हमासच्या दहशतवाद्यांनी शेकडो इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. हमासचे दहशतवादी रोज ओलिसांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे इस्त्रायल आता आपले विशेष दल सायरेत मतकल युद्धभूमीवर उतरवणार आहे. ओलिसांना हमासच्या तावडीतून सोडवणे आणि दहशतवाद्यांचे काम पूर्ण करणे हे त्या युनिटचे काम असेल. दरम्यान, ही स्पेशल फोर्स कुठे, केव्हा आणि कशी कारवाई करणार हे फक्त इस्रायलचे प्रमुख नेते आणि या फोर्सचे टॉप कमांडर यांनाच माहिती आहे.

Web Title: sayeret matkal israels top of the spear preps for hostage rescue hamas war latest update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.