अमेरिकेतील शाळेने योगा अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले

By admin | Published: March 26, 2016 01:46 PM2016-03-26T13:46:10+5:302016-03-26T13:47:34+5:30

ख्रिश्चन धर्मातील रुढी परंपरांवर गदा येत असल्याचं सांगत पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अमेरिकेतील शाळेने योगाच्या अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले आहे

The school in America excluded 'Namaste' from Yoga course | अमेरिकेतील शाळेने योगा अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले

अमेरिकेतील शाळेने योगा अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले

Next
>ऑनलाइन लोकमत - 
वॉशिंग्टन, दि. २६ - ख्रिश्चन धर्मातील रुढी परंपरांवर गदा येत असल्याचं सांगत पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अमेरिकेतील शाळेने योगाच्या अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही व्यक्तिला अभिवादन करताना आपण नमस्ते करतो. मात्र यामुळे ख्रिश्चन धर्मात नसलेल्या गोष्टी शिकवत जात असल्याचं सांगत पालकांनी यावर आक्षेप घेतला. 
 
पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर मुख्याध्यापकांनी माफी मागितली आणि अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळण्यास सांगितले. सोबतच  भारतीय धर्माचा प्रतिक म्हणून दाखवत येणारी रंगीत पानेदेखील अभ्यासक्रमातून काढण्यात आली आहेत. अमेरिकेतील सार्वजनिक शाळांमध्ये धार्मिक प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रार्थनेचादेखील समावेश आहे. 
 

Web Title: The school in America excluded 'Namaste' from Yoga course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.