धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:16 PM2024-10-01T16:16:06+5:302024-10-01T16:18:26+5:30
या घटनेत अनेक विद्यार्थी गंभीररित्या भाजले आहेत.
School Bus on Fire in Thailand : थायलंडमध्ये शाळेच्या बसला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी बँकॉकमधील एका शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघाली होती, यादरम्यान बसला अचानक आग लागली. घटनेवेळी बसमध्ये 44 जण होते, त्यापैकी 19 जणांनी बसमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला.
सविस्तर माहिती अशी की, ही बस आज, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास उथाई थानी भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघाली होती. यादरम्यान, बसचे टायर फुटले अन् बस डिव्हाडरवर धडकली. यावेळी अचानक बसने पेट घेतला आणि पाहता-पाहता आगीने रौद्र रुपण धारण केले. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाला होता.
Thailand School bus Fire Update-
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) October 1, 2024
Initially...there were 10 fatalities.! and many injured. #Bangkok#โหนกระแส#ไฟไหม้#ไฟไหม้รถบัส#Thailand#Schoolbus#Fire#ประเทศไทย#รถดับเพลิงpic.twitter.com/lVgc9LZdLy
अपघातादरम्यान भाजल्याने अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असल्यमुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सध्या सुरू आहे.