स्कूल बस उलटली; ३२ विद्यार्थ्यांंसह तीन अन्य ठार

By admin | Published: May 7, 2017 01:49 AM2017-05-07T01:49:45+5:302017-05-07T01:49:45+5:30

अंरूद दरीत शाळेची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ३२ विद्यार्थ्यांंसह दोन शिक्षक तथा बसचा चालक ठार झाल्याची घटना टांझानियाच्या

School Bus Toward; 32 students, including three others | स्कूल बस उलटली; ३२ विद्यार्थ्यांंसह तीन अन्य ठार

स्कूल बस उलटली; ३२ विद्यार्थ्यांंसह तीन अन्य ठार

Next

ऑनलाइन लोकमत
दार एस सलाम, दि. 7 -  अंरूद दरीत शाळेची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ३२ विद्यार्थ्यांंसह दोन शिक्षक तथा बसचा चालक ठार झाल्याची घटना टांझानियाच्या आरुशा प्रांतात शनिवारी घडली.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असताना हा अपघात झाला. मृत मुले ही इयत्ता सातवीचे विद्यार्थींं असून, दुसर्‍या शाळेत कार्यक्रमासाठी जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मगुफुली यांनी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. दरम्यान, हा अपघात तांत्रिक दोषामुळे अथवा मानवी चुकीमुळे झाला, याचा तपास टांझानिया पोलीस करीत आहे.

Web Title: School Bus Toward; 32 students, including three others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.