Science: शास्त्रज्ञांनी बनविले ऑक्सिजन देणारे ‘झाड’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:37 AM2023-04-18T09:37:15+5:302023-04-18T09:37:29+5:30

Science: हवेत सातत्याने वाढत असलेल्या कार्बन डायऑक्साइड जगासमोर प्रदूषणाचे मोठे संकट उभे राहिले आहे. शिवाय हा वायू तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे.

Science: Scientists made oxygen-giving 'trees' | Science: शास्त्रज्ञांनी बनविले ऑक्सिजन देणारे ‘झाड’

Science: शास्त्रज्ञांनी बनविले ऑक्सिजन देणारे ‘झाड’

googlenewsNext

हवेत सातत्याने वाढत असलेल्या कार्बन डायऑक्साइड जगासमोर प्रदूषणाचे मोठे संकट उभे राहिले आहे. शिवाय हा वायू तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. याचे प्रमाण कमी करायचे असेल तर झाडे लावणे हा एकमेव उपाय आहे. परंतु प्रदूषणाच्या संकटात सापडलेल्या, लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या आणि वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसलेल्या देशांनी काय करावे? यांच्यासाठी ‘लिक्विड ३’ हे ‘झाड’ रामबाण उपाय ठरेल. सर्बियातील शास्त्रज्ञांच्या गटाने हे कृत्रिम झाड तयार केले आहे. 

काय आहे ‘लिक्विड ३’? 
n हे झाड म्हणजे मोठी काचेची टाकी असते. यात सहाशे लिटर पाणी असते. पाण्यात विशिष्ट प्रकारचे एकपेशीय सूक्ष्म शेवाळ वाढविले जाते. 
n हे शेवाळ प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साइड शोषून घेते व बदल्यात शुद्ध ऑक्सिजन देते.
n याची क्षमता १० वर्षांच्या पूर्ण वाढलेल्या दोन झाडे किंवा २०० चौरस मीटर क्षेत्रावरील गवताइतकी असते. 
तांत्रिक भाषेत याला फोटो-बायो रिॲक्टर असे म्हणतात. 

सर्बियाला का गरज भासली?
दोन मोठ्या कोळसा ऊर्जा प्रकल्पांमुळे बेलग्रेड हे सर्बियातील सर्वात प्रदूषित झाले होते. २०१९ मध्ये युरोपातील पाचवे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून सर्बियाची नोंद झाली होती.
२०२० साली सर्वात खराब हवेच्या बाबतीत सर्बिया जगात २८ व्या स्थानी होते. तिथे हरित क्षेत्रे तयार करणे, झाडे लावणे कठीण आहे, कारण यासाठी मोकळ्या जागांचा अभाव आहे. 

सर्वात प्रथम कुठे बसविले?  पहिल्यांदा हे झाड सर्बियाच्या बेलग्रेड या शहरात सप्टेंबर २०२१ मध्ये बसविले. यात एक बाक बसविला असून तिथे स्मार्टफोन चार्ज करता येतो. याला एक सोलार ऊर्जेचे पॅनेलही बसविले आहे. प्रदूषणाची समस्या असणाऱ्या शहरांसाठी हे झाड मौल्यवान ठरणार आहे. 
संयुक्त राष्ट्राकडूनही सन्मान  
ग्लोबल एन्व्हायर्नमेंट फॅसिलिटी ही संस्था व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) यांच्याद्वारे राबविण्यात आलेल्या पर्यावरणस्नेही शहरी विकास प्रकल्पाकडून लिक्विड ३ चा सर्वात उत्तम ११ नावीन्यपूर्ण व पर्यावरणस्नेही उपक्रमांमध्ये समावेश केला आहे.

Web Title: Science: Scientists made oxygen-giving 'trees'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.