Science: "सागरतळाशी असलेल्या खड्डयात सापडलं असं काही...", रहस्य उलगडताना तज्ज्ञही हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:21 PM2022-08-22T12:21:52+5:302022-08-22T12:25:14+5:30

Science: हेरियट-वॅट युनिव्हर्सिटीचे भूशास्रज्ञ डॉ. उस्डेन निकोलसन यांना अटलांटिकच्या समुद्रात भूकंपीय रिफ्लेक्शनचा तपास करताना सागरतळाशी ४०० मीटर खोल अंतरावर सुमारे ८.५ किमी खोलीचा खड्डा सापडला आहे.

Science: "Something like that found in a pit at the bottom of the sea...", experts are also surprised when the mystery is revealed. | Science: "सागरतळाशी असलेल्या खड्डयात सापडलं असं काही...", रहस्य उलगडताना तज्ज्ञही हैराण 

Science: "सागरतळाशी असलेल्या खड्डयात सापडलं असं काही...", रहस्य उलगडताना तज्ज्ञही हैराण 

Next

लंडन -  हेरियट-वॅट युनिव्हर्सिटीचे भूशास्रज्ञ डॉ. उस्डेन निकोलसन यांना अटलांटिकच्या समुद्रात भूकंपीय रिफ्लेक्शनचा तपास करताना सागरतळाशी ४०० मीटर खोल अंतरावर सुमारे ८.५ किमी खोलीचा खड्डा सापडला आहे. शास्त्रज्ञांच्या मते या खड्ड्याची निर्मिती एखाद्या मोठ्या लघुग्रहाच्या टक्करीमुळे झाली असावी. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर आदळलेला हा लघुग्रह जेव्हा पृथ्वीवरून डायनासोरचा अंत झाला तेव्हाचा असावा. 

जर्नल सायन्स अॅडव्हान्समध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये शास्त्रज्ञांनी सांगितले की, जर ते समुद्र तळावरून सॅम्पल मिळवण्यात यशस्वी झाले तर ते आपल्या गृहितकांना अधिक पक्के करण्यात यशस्वी ठरतील. शास्त्रज्ञांच्या मते हा लघुग्रह पृथ्वीवर सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी आदळला होता. हा तोच काळ आहे जेव्हा एका लघुग्रहाच्या टक्करीमुळे पृ्थ्वीवरून डायनासोर प्रजातीचा अंत झाला होता. मात्र या दाव्याबाबत शास्त्रज्ञ पूर्णपणे आश्वस्त नाही आहेत.

शास्त्रज्ञांनी कंप्युटर सिम्युलेशन तंत्राचा प्रयोग करून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामधून यावर्षी जानेवारी महिन्यात टोंगाच्या समुद्रात ज्वालामुखीच्या उद्रेकातमुळे उत्पन्न झालेल्या उर्जेपेक्षा हजारपट उर्जा या लघुग्रहाच्या टक्करीमुळे निर्माण झाली असावी, अशी माहिती समोर आली. पण हे केवळ प्राथमिक निष्कर्ष आहेत. या दाव्यांना अधिक बळ देण्यांसाठी शास्त्रज्ञांना अधिक डेटा हवा आहे.   
 

Web Title: Science: "Something like that found in a pit at the bottom of the sea...", experts are also surprised when the mystery is revealed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.