वैज्ञानिक चक्रावले; छोट्याशा ता-याभोवती महाकाय ग्रहाचे भ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:02 AM2017-11-03T01:02:04+5:302017-11-03T01:03:27+5:30
पृथ्वीपासून ६०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नव्या महाकाय ग्रहाचा शोध लावणारे वैज्ञानिक त्याच्या खगोलीय समीकरणांनी चक्रावून गेले असून, एखाद्या ताºयाभोवती ग्रहमाला कशी तयार होते याविषयीच्या सर्वमान्य सिद्धान्ताची फेरतपासणी करावी लागण्याची शक्यता त्यांना वाटत आहे.
लंडन : पृथ्वीपासून ६०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नव्या महाकाय ग्रहाचा शोध लावणारे वैज्ञानिक त्याच्या खगोलीय समीकरणांनी चक्रावून गेले असून, एखाद्या ताºयाभोवती ग्रहमाला कशी तयार होते याविषयीच्या सर्वमान्य सिद्धान्ताची फेरतपासणी करावी लागण्याची शक्यता त्यांना वाटत आहे.
या ग्रहाचे नव्या वैज्ञानिकांनी ‘एनजीटीएस-१बी’ असे नामकरण केले आहे. याचे आकारमान आपल्या ग्रहमालेतील बुध ग्रहाएवढे आहे, पण तो ज्या विझत चाललेल्या, तांबूस रंगाच्या ताºयाभोवती (ड्वार्फ स्टार) परिक्रमा करत आहे त्या ताºयाचा आकार मात्र या ग्रहाच्या तुलनेत निम्मा आहे! ब्रह्मांडात कुठेही एवढ्या लहान ताºयाच्या ग्रहमालेत त्याच्याहून कितीतरी मोठा ग्रह असू शकेल याची कल्पनाही वैज्ञानिकांनी कधी केली नव्हती. आजवर जेवढ्या ग्रह-ताºयांचा शोध घेण्यात आला आहे त्यात या नव्या ग्रह-ताºयाच्या जोडगोळीच्या आकारमानाचे गुणोत्तर बुचकळ्यात टाकणारे आहे. या नव्या ग्रहाचा शोध लावणाºया वैज्ञानिक चमूचे प्रमुख व वॉरविक विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. डॅनियल बेलिस म्हणाले की, ‘एनजीटीएस-१बी’चा शोध आमच्यासाठी एक अचंबा आहे. एवढा महाकाय ग्रह एवढ्या लहानशा ताºयाभोवती परिभ्रमण करत असेल व किंबहुना करू शकेल, याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. या नव्या शोधाने ग्रहमालांच्या निर्मितीबद्दलचे आजवरचे संचित ज्ञान पुन्हा तपासून पाहावे लागेल. (वृत्तसंस्था)
नव्या ग्रहाचे अनोखेपण
- पृथ्वीपासूनचे अंतर-६०० प्रकाशवर्षे
- आकारमान-आपल्या बुध ग्रहाएवढे
- वायुरूप महाकाय गोळा
- पृष्ठभागाचे तापमान ५३० सेंटीग्रेड
- ताºयाभोवती प्रदक्षिणाकाळ २.६ दिवस
- केंद्रीय ताºयापासूनचे अंतर पृथ्वी व
सूर्यामधील अंतराच्या ३ टक्के
‘एनजीटीएस-१ बी’ हा ग्रह महाकाय असला तरी तो शोधणे कठीण होते, कारण त्याचा तारा खूपच लहान व अंधूक आहे. खरेतर ब्रह्मांडात लहान तारेच सर्वसाधारणपणे आढळतात. त्यामुळे अशा छोट्या ताºयांभोवती फिरणारे त्यांच्याहून मोठे ग्रह आणखीही असू शकतील. त्यांचा शोध आता घ्यावा लागेल. ‘एनजीटीएस’ प्रकल्पाच्या १० वर्षांच्या परिश्रमानंतर हा अनोखा ग्रह सापडणे रोमांचक आहे. - प्रा. पीटर व्हीटले, वॉरविक विद्यापीठ