जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिकांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 04:35 AM2018-06-24T04:35:03+5:302018-06-24T04:35:07+5:30
वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर विकसित केल्याचा दावा केला आहे
वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर विकसित केल्याचा दावा केला आहे. हा कॉम्प्युटर फक्त ०.३ मिलीमीटर एवढा आहे आणि कॅन्सरचा शोध घेणे आणि त्यावर उपचारांसाठी नवे दरवाजे खुले करण्यासाठी हा मदत करु शकतो.
या कॉम्प्युटरमधील सिस्टीम २ बाय २ बाय ४ मिलीमीटरची आहे. यात बाहेरुन सपोर्ट नसला तरी प्रोग्रामिंग आणि डेटा कायम रहातो. वीज आल्यानंतर तो सुरु होतो आणि डेटाही कायम ठेवतो. पण, नव्या माइक्रोडिव्हाइसमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.
डिस्चार्ज झाल्यानंतर यातील प्रोग्राम आणि डेटा समाप्त होईल. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्र्रोफेसर डेव्हिड ब्लाऊ म्हणाले की, याला कॉम्प्युटर म्हणावे की, नाही याबाबत आम्ही संभ्रमात आहोत.
यात कॉम्प्युटरसारखे किमान फंक्शन आहेत की नाही याबाबत मतमतांतरे असू शकतात. या कॉम्प्युटरच्या सहाय्याने अनेक प्रकारची कामे केली जाऊ शकतात. हा कॉम्प्युटर बनविणाऱ्या टीमने याचा उपयोग तापमानाच्या मापदंडाच्या स्पष्टतेसाठी करण्याचा निश्चय केला आहे.
नव्या कॉम्प्युटर उपकरणात रॅम आणि फोटो व्होल्टिक्सशिवाय प्रोसेसर अणि वायरलेस ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहेत. दृश्य प्रकाशाच्या साहाय्याने ते डेटा प्राप्त करतात. यात अधिक प्रकाश सहन करण्याची क्षमताही आहे. कमी विजेवरही हा कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे चालतो. अध्ययनातून असे दिसून आले आहे की, ट्यूमर सामान्य उतीपेक्षा जास्त गरम होतात. या कॉम्प्युटरच्या साह्याने कॅन्सर उपचारासाठी मदत होऊ शकते.