शास्त्रज्ञांनी तयार केला ‘जन्म’ देणारा रोबो! अमेरिकेतील संशोधन, आरोग्य क्षेत्रात होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:07 AM2021-12-01T07:07:30+5:302021-12-01T07:08:12+5:30
Robot : आता शास्त्रज्ञांनी सजीव यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. त्यांना ‘झेनोबोट्स’ असे नावही देण्यात आले आहे.
वॉशिंग्टन - रोबो म्हणजे यंत्रमानव. आपण आज्ञा द्यायची आणि त्याने ती ऐकायची. अशा या रोबोला त्याची स्वत:ची बुद्धी वगैरे काही नसते. त्याच्या यांत्रिक मेंदूत सर्व आज्ञावली फिट्ट केली जाते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी सजीव यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. त्यांना ‘झेनोबोट्स’ असे नावही देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी अमेरिकी संशोधकांनी बेडकाच्या एम्ब्रायोपासून मिळविण्यात आलेल्या उतींचा वापर करत सिंथेटिक जीव तयार करणार असल्याची घोषणा केली होती. ही प्रयोगशाळेतील सजीवांची निर्मितीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. (वृत्तसंस्था)
रोबोंची निर्मिती कुठे?
- व्हरमाँट विद्यापीठ nहार्वर्ड विद्यापीठाचे वीस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकली इन्स्पायर्ड इंजिनिअरिंग -टफ्ट्स विद्यापीठ
नेमके काय आढळले?
-‘झेनोबोट्स’ हालचाली करत असून वस्तूंची ने-आणही करत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी मांडले आहे.
- ‘झेनोबोट्स’ स्वत:च पुनरुत्पादन करू शकणार आहेत.
- पुनरुत्पादनाची ही प्रक्रिया प्राणी आणि वृक्ष यांच्यापेक्षा विभिन्न असेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
वापर कुठे केला जाऊ शकतो?
हा एक महत्त्वाचा शोध असून ‘झेनोबोट्स’चा वापर प्लास्टिकचे सूक्ष्म कण वेचून नष्ट करण्याबरोबरच कर्करोगावरील उपचार, जन्मदोष व वयोमानपरत्वे येणाऱ्या आजारांवर करता येणार आहे.
- प्राध्यापक मायकल लेविन, शास्त्रज्ञ
(अमेरिकेच्या राष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेच्या मासिक अहवालात या प्रयोगाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.)