शरीराच्या कोणकोणत्या भागांना प्रभावित करतो कोरोना? वैज्ञानिकांनी केले हैराण करणारे खुलासे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:50 PM2020-08-24T23:50:25+5:302020-08-24T23:53:14+5:30

विज्ञानिकांनी म्हटले आहे, की या मॉडेलच्या माध्यमाने अध्ययनादरम्यान दिसून आले, की कोरोना व्हायरस मल्टी-ऑर्गन मेटाबॉलिक डिसीज आहे. याचा अर्थ हा आजार शरीरातील बहुतांश भागांना प्रभावित करतो.

scientists disclose that multi organ metabolic disease finds due to coronavirus infection | शरीराच्या कोणकोणत्या भागांना प्रभावित करतो कोरोना? वैज्ञानिकांनी केले हैराण करणारे खुलासे 

शरीराच्या कोणकोणत्या भागांना प्रभावित करतो कोरोना? वैज्ञानिकांनी केले हैराण करणारे खुलासे 

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी एक विशेष मेटाबॉलिक मॉडेल तयार केले आहे.मॉडेलच्या माध्यमाने अध्ययनादरम्यान दिसून आले, की कोरोना व्हायरस मल्टी-ऑर्गन मेटाबॉलिक डिसीज आहे.कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर केवळ श्वसनासंदर्भातीलच नाही, तर मेटाबॉलिक म्हणजे, चयापचयासंदर्भातील समस्याही समोर येऊ लागल्या आहेत.

मेलबर्न - कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी एक विशेष मेटाबॉलिक मॉडेल तयार केले आहे. याच्या सहाय्याने, व्हायरसने शरीराच्या कोणकोणत्या भागांना प्रभावित केले आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. विज्ञानिकांनी म्हटले आहे, की या मॉडेलच्या माध्यमाने अध्ययनादरम्यान दिसून आले, की कोरोना व्हायरस मल्टी-ऑर्गन मेटाबॉलिक डिसीज आहे. याचा अर्थ हा आजार शरीरातील बहुतांश भागांना प्रभावित करतो.

वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर केवळ श्वसनासंदर्भातीलच नाही, तर मेटाबॉलिक म्हणजे, चयापचयासंदर्भातील समस्याही समोर येऊ लागल्या आहेत.

प्लाझ्मा नमुन्यांपासून काढला निष्कर्ष -
या अध्ययनासाठी ऑस्ट्रेलियातील मर्डोक विद्यापीठ आणि ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एका समूहाचे प्लाझ्मा नमूने एकत्र केले आणि ते स्वस्थ लोकांच्या समूहाच्या प्लाझ्मा नुमुन्यांशी जुळवून पाहिले, याचा उद्देश दोन्ही समूहांतील नमून्यांत नेमका काय मेटाबॉलिक फरक आहे, हे पाहणे होता. 

संपूर्ण शरीराची केमेस्ट्रीच बदलते -
संशोधकांनी सांगितले, की या नमुन्यांतून अनेक अजारांचे बायोलॉजिकल फिंगरप्रिंट दिसून आले आहेत. यात लिव्हर खराब होणे, डायबेटीज आणि कोरोनरी हार्ट डिसीजच्या धोक्याचाही समावेश आहे. संशोधकांनी सांगितले, की जे लोक सार्स सीओवी-2 व्हायरसने संक्रमित होते, त्यांच्यात या आजारांचा दीर्घकाळ प्रभाव जाणवला. ते म्हणाले, जेव्हा एखाद्या व्यक्तीला संक्रमक आजार होतो. तेव्हा काही काळासाठी हे बायोलॉजिकल फिंगरप्रिंट्स त्याच्या संपूर्ण शरीराची केमेस्ट्रीच बदलून टाकतात. याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर दिसून येतो.

फुफ्फुसासह लिव्हरवरही परिणाम -
मर्डोक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, जेरेमी निकोल्सन यांनी म्हटले आहे, की 'कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर होतो, हे या संशोधनातून समोर येते. यासाठीही हे संशोधन महत्वाचे आहे. याचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसावर होतो. एवढेच नाही, तर अनेकांचे लिव्हर खराब झाल्याचेही संकेत मिळाले आहेत.' अनेक मेटाबॉलिक फिचर्स सर्वसाधारण परीक्षणांत दिसून येत नाहीत. वेळेनुसार यात बदल होऊन आजार आणखी वाढू लागतो. अशात आपले, 'मेटाबॉलिक मॉडेल' अत्यंत उपयोगी ठरू शकते आणि वेळ असतानाच लोकांवर उपचार होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या -

कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

Web Title: scientists disclose that multi organ metabolic disease finds due to coronavirus infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.