शास्त्रज्ञांना चीनमध्ये सापडले डायनासोरचे ठसे
By admin | Published: March 14, 2017 12:38 AM2017-03-14T00:38:07+5:302017-03-14T00:38:07+5:30
चीनमधील जिलीन प्रांतामध्ये शास्त्रज्ञांनी हजारो वर्षांपूर्वी अस्तित्व असलेल्या डायनासोर या प्राण्याचे ठसे शोधून काढले आहेत. ही माहिती त्यांनी येथील एका वृत्तसंस्थेला दिली.
चीन : चीनमधील जिलीन प्रांतामध्ये शास्त्रज्ञांनी हजारो वर्षांपूर्वी अस्तित्व असलेल्या डायनासोर या प्राण्याचे ठसे शोधून काढले आहेत. ही माहिती त्यांनी येथील एका वृत्तसंस्थेला दिली.
डायनासोरच्या पायाचे ठसे २१ से.मी. आणि ४३ से.मी. असल्याचे छायाचित्रणात दिसून आले आहेत. लाँजिग सिटीमधील डोंगरावरील रस्त्यावर विविध आकारांमध्ये हे ठसे सापडले असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र, डायनासोरचे वय, ठसे किती वर्षांपूर्वीचे किंवा त्यांच्या कालावधीबाबत त्यांनी माहिती दिली नाही. आॅगस्ट २0१५ मध्ये शास्त्रज्ञांना याची माहिती मिळाली होती. मात्र, आता छायाचित्रण केले असल्याचे त्यांनी सांगितले. या शोधकार्याला चीन, रिपब्लिक आॅफ आणि युनायटेड स्टेट्सच्या शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. तसेच ५५ सें. मी. लांब आकाराचे सापडलेले ठसे हॅडसोर्स प्राण्याचे असल्याचे चीन विद्यापीठाचे प्राध्यापक झिंग लिडा यांनी
सांगितले.
आणखी काही ठशांमध्ये २१ ते ४३ सें.मी. पर्यंतच्या ठशांचा शोध लागला आहे.
डायनासोरचे अस्तित्व दिसून आलेल्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी उथळ तलाव होता. येथे डायनासोर अन्नाच्या शोधात येत असावेत, असे सांगण्यात येते. या माहितीच्या आधारे या ठिकाणी आणखी माहिती मिळविता येईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.