Wuhan Lab च्या वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, कोरोनाबाबत मोठा गौप्यस्फोट

By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 01:23 PM2021-01-17T13:23:39+5:302021-01-17T13:26:20+5:30

रहस्यमय गुफेतील चिनी वैज्ञानिकांचा व्हिडीओ आला समोर

Scientists at Wuhan lab admit being bitten while collecting samples in cave which is home to Covid infected bats | Wuhan Lab च्या वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, कोरोनाबाबत मोठा गौप्यस्फोट

Wuhan Lab च्या वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, कोरोनाबाबत मोठा गौप्यस्फोट

googlenewsNext
ठळक मुद्देसंशोधनादरम्यान एका वॅज्ञानिकाच्या हाताचा वटवाघुळानं चावाही गुफा कोविड संक्रमित वटवाघुळांची गुफा मानली जाते

सध्या कोरोनावर संशोधन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम वुहानमध्ये पोहोचली आहे. याच दरम्यान मात्र एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. चिनमधील रहस्यमय गुफांमध्ये वटवाघुळांचे नमूने घेत असताना वैज्ञानिकांचा वटवाघुळांनी चावा घेतला असल्याची कबुली काही चिनी वैज्ञानिकांनी दिली. चिनमधील या गुंफा कोरोना संक्रमित वटवाघुळांचं घर असल्याचं मानलं जात आहे. चिनी सरकारी टिव्ही चॅनल सीसीटीव्हीवर दोन वर्षांपूर्वी एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये चिनी वैज्ञानिकांनी वटवाघुळांनी आपाला चावा घेतल्याचं कबुल केल्याचं दिसत आहे. तसंच या ठिकाणी नमूने घेत असताना चिनी वैद्यानिकांनी हलगर्जीपणाही केला त्यामुळे वटवाघुळांनी त्यांचा चावा घेतल्याचं यात दिसत आहे. जाणून घेऊया नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये.

वुहान इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीवर सुरक्षा मापदंडांचं पालन न करता काम करण्याचे आरोप अनेकदा करण्यात आलेल आहेत. तैवान न्यूजच्या एका वृत्तानुसार २९ डिसेंबर २०१७ रोजी सीसीटीव्ही चॅनलवर दाखवण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये चिनी लॅबच्या हलगर्जीपणाचे पुरावे सापडत असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ चीनच्या बॅट वूमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैज्ञानिक शी झेंगली आणि त्याच्या टीमच्या सार्सच्या ओरिजिनची माहिती घेण्यासाठी तयार करण्यात आला होता. बायोसेफ्टी लेव्हल ४ ची लॅब म्हणून ओळख असलेल्या वुहान लॅबच्या वैज्ञानिकांनी गुफेत वटवाघुळांना पकडताना हलगर्जीपणा केला. यादरम्यान एका वटवाघुळां चिनी  वैज्ञानिकाच्या हाताचा चावा घेतला. खुद्द वैज्ञानिकानंही याची कबुली दिली. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे या टीमचे सदस्य संक्रमित समजल्या जाणाऱ्या बाबी शॉर्ट्स आणि टीशर्ट घालून एकत्र करता दिसले. तसंच यादरम्या कोणीही पीपीई किटदेखील परिधान केलं नव्हतं.

सुईप्रमाणे टोचलं

"त्या वटवाघुळाचे विषारी दात हातावर घातलेल्या रबरच्या ग्लोव्हजमधून माझ्या हातात घुसले. माझ्या हातात कोणी सुई टोचली असेल असं त्या वेळी जाणवलं," असं एका वैज्ञानिकानं सांगितलं. याव्यतिरिक्त त्या व्हिडीओत एक वैज्ञानिक गोल्व्ह्ज शिवाय काम करताना दिसून आला. हे लोकं जिवंत विषाणूवर काम करत होते आणि त्यांनी मास्कदेखील परिधान केलं नव्हतं. हा गौप्यस्फोट अशावेळी झाला ज्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीमही वुहानमध्ये पोहोचली आहे. 

चीननं मोठ्या विरोधानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमला वुहानमध्ये येण्याची परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे व्हिडीओ बाबात सांगायचं झालं तर एका वैज्ञानिकानं उघड्या हातानं वटवाघुळ पकडल्याचंही दिसून आलं आहे. दरम्यान, वटवाघुळानं चावा घेतल्यानंतर हाताला सुज आल्याचंही वैज्ञानिकानं व्हिडीओमध्ये दाखवलं आहे. याव्यतिरिक्त वटवाघुळांमध्ये कशाप्रकारे घातक विषाणू असतात हेदेखील तोच वैज्ञानिक सांगताना दिसत आहे. याव्यतिरिक्त या गुफेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आल्याचंही वैज्ञानिकानं सांगितलं. सुरूवातीला हा व्हिडीओ सायन्स एक्सप्लोरेशन सेंटरनं प्रदर्शित केला होता. परंतु त्यानंतर चीननं तो व्हिडीओवर कात्री चालवली. 

 

Web Title: Scientists at Wuhan lab admit being bitten while collecting samples in cave which is home to Covid infected bats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.