SCO Summit 2022: 'ही रशियाची परंपरा नाही', मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास पुतिन यांचा नकार, पहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 08:29 PM2022-09-16T20:29:14+5:302022-09-16T20:29:40+5:30
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे, पण पुतिन यांनी शुभेच्छा देण्यास नकार दिला. पहा व्हिडिओ...
SCO Summit 2022: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन(SCO) मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उझबेकिस्तानमध्ये (Uzbekistan) गेले आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. यादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मोदींनी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आलाय.
उद्या म्हणजेच 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी मोदी आजच भारताकडे रावाना होणार आहेत. तत्पुर्वी समरकंदमध्ये(Samarkand) अनेकांनी मोदींना अॅडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, पुतिन (Vladimir Putin) यांनी मोदींना अॅडव्हान्स शुभेच्छा देण्यास नकार दिला.
काय म्हणाले पुतिन?
#WATCH | My dear friend, tomorrow you are about to celebrate your birthday...,says Russian President Vladimir Putin to PM Modi ahead of his birthday
— ANI (@ANI) September 16, 2022
(Source: DD) pic.twitter.com/93JWy2H43S
यावेळी पुतिन म्हणाले की, ‘माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी, तुमचा उद्या वाढदिवस आहे. पण, मी आज तुम्हाला शुभेच्छा देणार नाही. रशियाच्या परंपरेनुसार, वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा दिल्या जात नाहीत. त्यामुळे मी आजच तुम्हाला शुभेच्छा देणार नाही. मी तुम्हाला इतक्याच शुभेच्छा देतो की, तुमच्या नेतृत्वात भारताची प्रगती होवो. तुम्हाला माहितीये की, भारतासारख्या मित्रराष्ट्राच्या पाठीशी आम्ही नेहमी आहोत. भारताचा विकास व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत आहेत. भारत आणि रशियातील मैत्री-विश्वास कायम राहो, हीच सदिच्छा.'