युरोपवर पुन्हा सायबर हल्ला, बँक व कंपन्यांसह सरकारी कार्यालयांना फटका

By admin | Published: June 27, 2017 09:17 PM2017-06-27T21:17:21+5:302017-06-27T22:10:16+5:30

युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला करण्यात आला आहे. या

Scores of cyber attacks, bank and companies hit the government offices again in Europe | युरोपवर पुन्हा सायबर हल्ला, बँक व कंपन्यांसह सरकारी कार्यालयांना फटका

युरोपवर पुन्हा सायबर हल्ला, बँक व कंपन्यांसह सरकारी कार्यालयांना फटका

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 27 - युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यामुळे युरोपमधल्या बँक आणि कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही ठप्प झालं आहे. हा व्हायरस रॅन्समवेअरचाच एक भाग असून, पेट्या असे त्याचे नाव आहे. सायबर हल्ल्यामुळे ब्रिटिश बहुराष्ट्रीय जाहिरात आणि जनसंपर्क कंपनी WPPसह अनेक कंपन्या प्रभावित झाल्या आहेत. विशेष म्हणजे युक्रेनला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

युक्रेनमधील वीज कंपन्या, सरकारी कार्यालयांतील संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या वन्नाक्राय रॅन्समवेअर सारखाच हा हल्ला आहे. युक्रेनची सेंट्रल बँक, सरकारी वीज वितरक कंपनी युक्रेनेर्गो, विमान निर्माती कंपनी एंतोनोव आणि दोन पोस्ट ऑफिस वाईट पद्धतीनं या व्हायरसमुळे प्रभावित झाले आहेत. युक्रेनची राजधानी किव्हमधल्या मेट्रोमध्ये पेमेंट कार्डलाही याचा फटका बसला आहे. तर पेट्रोल पंपांवरही कामकाज थांबवण्यात आलं आहे. युक्रेनच्या पंतप्रधानांनी या हल्ल्याला अनपेक्षित हल्ला असं म्हटलं आहे. युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी ट्विटर अकाऊंटवर एक फोटो टाकला आहे. त्या फोटोमध्ये यंत्रणा वाईट पद्धतीनं कोलमडल्याचं दिसते आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, संगणकतज्ज्ञ एलन वुडवर्ड यांनी हा हल्ला म्हणजे रॅन्समवेअरचाच एक भाग असल्याचं सांगितलं आहे. ज्या वेळी या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात आलं तेव्हा गुन्हेगारांनी व्हायरसला अपडेट केलं. आता रॅन्समवेअरचाच एक भाग असलेल्या या पेट्या नावाच्या व्हायरसनं धुडगूस घातला आहे.

गेल्या महिन्यात रॅन्समवेअर व्हायरसने 100 पेक्षा जास्त देशांत धुमाकूळ घातला होता. रशिया आणि ब्रिटन या देशांना सर्वाधिक फटका बसल्याचे सांगण्यात येत होते. एक्सपीसारख्या जुन्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या संगणकांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. व्हायरसच्या हल्ल्यानंतर संगणक लॉक होतो. तो उघडण्यासाठी व्हायरस बिटकॉनसारख्या आभासी चलनातील 300 डॉलरची खंडणी मागतो. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सुरक्षा पॅच तयार केला असून, तो तात्काळ डाऊनलोड करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत.

Web Title: Scores of cyber attacks, bank and companies hit the government offices again in Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.