स्कॉटलंडने वेगळे होऊ नये- कॅमेरून
By admin | Published: September 11, 2014 02:26 AM2014-09-11T02:26:34+5:302014-09-11T02:26:34+5:30
इंग्लंडच्या कुटुंबातून फुटून बाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बुधवारी स्कॉटलंडला केले.
लंडन : इंग्लंडच्या कुटुंबातून फुटून बाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बुधवारी स्कॉटलंडला केले.
स्कॉटलंड इंग्लंडपासून वेगळे व्हावे का यासाठी येत्या १८ सप्टेंबर रोजी अंतिम जनमत घेतले जाणार आहे. याच विषयावर सप्ताहाच्या शेवटी झालेल्या मत चाचणीत वेगळे व्हा म्हणणारे ४१ टक्के होते. मंगळवारी झालेल्या मतदानात होय आणि नाही म्हणणारे सारखे म्हणजे ४१ झाले. या पार्श्वभूमीवर डेव्हिड कॅमेरून थेट स्कॉटलंडला गेले. ३०७ वर्षांपासून इंग्लंड व स्कॉटलंड एक आहेत. स्कॉटलंड वेगळे झाले तर हृदयाचे तुकडे होतील, असे भावनिक आवाहन कॅमेरून यांनी केले. एडिनबर्गमध्ये प्रचार भाषणात कॅमेरून म्हणाले की, मी माझ्या पक्षापेक्षा माझ्या देशावर प्रेम करतो. जनमत चाचणीत स्कॉटलंड वेगळे व्हावे, असे स्पष्ट झाले तर त्याचा सन्मान उर्वरित इंग्लंड करील आणि पंतप्रधान या नात्याने ते मला घडवावे लागेल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)