ऑस्ट्रेलियात पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन, 11 वर्षातील सहावे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:18 AM2018-08-24T11:18:29+5:302018-08-24T11:18:56+5:30
ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कॅनबरा : ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांच्याविरोधातील स्वपक्षीयांच्या बंडानंतर स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांचे जवळचे सहकारी स्कॉट मॉरिसन यांचा 45 मतांनी विजय झाला.
माल्कम टर्नबुल यांनी आणखी एक सहकारी परराष्ट्रमंत्री जुली बिशप सुद्धा या निवडणूकीच्या शर्यतीत होती. मात्र पहिल्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या. याशिवाय माजी गृहमंत्री पीटर डटन यांच्या नावाची सुद्धा ऑस्टेलियाच्या पंतप्रधानपदासाठी चर्चा होती.
ऑस्ट्रेलियात गेल्या 11 वर्षात सहा पंतप्रधानाची निवड झाली आहे. माल्कम टर्नबुल यांनी सांगितले की, त्यांना एक याचिका मिळाली होती. त्यामध्ये म्हटले होते की, तुमच्या पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पार्टीने नवीन नेता निवडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्तावानंतर लेबर पार्टीने पुन्हा एका सिनेटमध्ये माल्कम टर्नबुल यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून पुन्हा निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे.
Scott Morrison has been picked as Australia's new prime minister, reports AFP pic.twitter.com/7wuAYuXL9I
— ANI (@ANI) August 24, 2018