स्कॉटिश जनता घडविणार इतिहास?
By admin | Published: September 13, 2014 02:10 AM2014-09-13T02:10:27+5:302014-09-13T02:10:27+5:30
येत्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वमतात स्कॉटलंडवासी काय कौल देतात, याकडे उभ्या जगाचे लक्ष लागले आहे. स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला
एडिनबर्ग : येत्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वमतात स्कॉटलंडवासी काय कौल देतात, याकडे उभ्या जगाचे लक्ष लागले आहे. स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला, तर ग्रेट ब्रिटनची (युनायटेड किंगडम) फाळणी अटळ आहे, असे झाल्यास ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांचे सरकारही धोक्यात येऊ शकते. या सार्वमताच्या पार्श्वभूमीवर फाळणी टाळण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘बेटर टुगेदर’, तर दुसरीकडे स्कॉटिश नॅशनल पार्टीने ‘येस कॅम्पेन’ सुरू केले आहे.
या सार्वमताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कॅमेरून यांनी स्कॉटलंड गाठून तेथील जनतेला वेगळे न होता ब्रिटनसोबत राहण्याचे आवाहन केले. तथापि, ताज्या जनमतचाचणीच्या निष्कर्षानुसार ५२ टक्के मतदार स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत. तथापि, समर्थक आणि विरोधकांतील फरक फक्त ४ टक्के आहे.
स्कॉटलंड इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्पेनसह अवघ्या जगाचे लक्ष स्कॉटलंडकडे आहे. १८ सप्टेंबर रोजीचे सार्वमत म्हणजे राष्ट्रीय सक्षमीकरणाची प्रक्रिया असेल. स्कॉटलंडची जनता आपली नियती स्वत:च ठरविणार आहे, असे स्वातंत्र्यवादी नेते अॅलेक्स सॅलमंड यांनी म्हटले आहे. ब्रिटिश मीडियानुसार ९७ टक्के मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे.(वृत्तसंस्था)