भारतीय कंपन्यांचे सीमोल्लंघन, अमेरिकेला दिल्या ९१ हजार नोक-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2015 02:52 PM2015-07-15T14:52:49+5:302015-07-15T14:54:24+5:30
मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात रोजगार निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असतानाच भारतीय कंपन्या परदेशात झपाट्याने विकास करत आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात रोजगार निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असतानाच भारतीय कंपन्या परदेशात झपाट्याने विकास करत आहेत. भारतातील १०० हून अधिक कंपन्यांनी अमेरिकेत १५ अब्जहून अधिक डॉलर्सची गुंतवणूक केली असून या माध्यमातून अमेरिकेत तब्बल ९१ हजार रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
एका सर्वेक्षणानुसार भारतातील १०० कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये सुमारे १५ बिलीयन डॉलर्सची गुंवतणूक केली असून सर्वाधिक गुंतवणूक दक्षिण टेक्सास राज्यात झाली आहे. तर भारतीय कंपन्यांनी सर्वाधिक रोजगार न्यूजर्सीमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. या राज्यात भारतीय कंपन्यांनी तब्बल ९,२८७ लोकांना रोजगार दिला असून न्यूयॉर्कमध्ये हेच प्रमाण ४,१३४ ऐवढे आहे. विद्यमान भारतीय कंपन्यांपैकी ८४ टक्के कंपन्यांना अमेरिकेत आणखी गुंतवणूक करायची असून ९० टक्क्याहून अधिक कंपन्यांना आगामी पाच वर्षात जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यायचा आहे.