सिक्कीम सीमेलगत चीनचा दुसरा रेल्वेमार्ग

By admin | Published: August 16, 2014 02:04 AM2014-08-16T02:04:01+5:302014-08-16T02:04:01+5:30

तिबेटमधील दुसऱ्या रेल्वेमार्गाचे शुक्रवारी चीनने उद्घाटन केले. या मार्गासाठी २.१६ दशलक्ष डॉलर्सचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग सिक्कीममधील भारताच्या सीमेलगत आहे

Second railway line in Sikkim, China | सिक्कीम सीमेलगत चीनचा दुसरा रेल्वेमार्ग

सिक्कीम सीमेलगत चीनचा दुसरा रेल्वेमार्ग

Next

बीजिंग : तिबेटमधील दुसऱ्या रेल्वेमार्गाचे शुक्रवारी चीनने उद्घाटन केले. या मार्गासाठी २.१६ दशलक्ष डॉलर्सचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग सिक्कीममधील भारताच्या सीमेलगत आहे. या मार्गामुळे हिमालयातील महत्त्वाच्या भागात चिनला आपल्या सैन्यासाठीच्या साधनसामुग्रीची ने-आण करणे अधिक सोपे होणार आहे.
२५३ कि.मी.चा हा रेल्वेमार्ग तिबेटची राजधानी ल्हासा आणि झिगेज् या दोन शहरांना जोडणार आहे. सिक्कीम सीमारेषेबरोबरच नेपाळ आणि भूतान या देशांच्या सीमाही जवळच आहेत. याचबरोबर अरूणाचल प्रदेश जवळून रेल्वे मार्ग उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

Web Title: Second railway line in Sikkim, China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.