मलेशियन एअरलाइन्सच्या गायब झालेल्या 'त्या' विमानाचं उलगडलं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:06 PM2018-07-30T17:06:08+5:302018-07-30T17:14:38+5:30
रहस्यमय पद्धतीनं गायब झालेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे काही धागेदोरे मलेशियन सरकारच्या हाती लागले आहेत.
क्वालालंपूर- रहस्यमय पद्धतीनं गायब झालेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे काही धागेदोरे मलेशियन सरकारच्या हाती लागले आहेत. 4 वर्षांपासून अचानक गायब झालेल्या विमानाबद्दल अद्याप कोणताही अधिकृत पुरावा सापडलेला नाही. रिपोर्टनुसार, परंतु या विमानाचा हेरगिरीच्या माध्यमातून जाणूनबुजून संपर्क तोडण्यात आला होता. परंतु तसे ठोस पुरावे नसल्याचंही मलेशिया सरकारनं स्पष्ट केलं आहे.
मलेशियाच्या एमएच 370 या बेपत्ता विमानातील प्रवासी वैमानिकाने ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने गुदमरून मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हे विमान हिंदी महासागरात पाडण्यात आल्याचा दावाही याआधीच्या अहवालातून करण्यात आला होता. हे विमान बेपत्ता होण्याच्या चार तास अगोदर विमानातील लोक बेशुद्ध झाल्यानंतर ते बेपत्ता झाले, असे न्यूझीलंडचे हवाईतज्ज्ञ इवान विल्सन यांनी सांगितले होते.
वैमानिकाने केबिनमधला ऑक्सिजनचा दाब केला, तसेच विमान अस्थिर होऊन हलू लागल्यानं मास्क पडले, त्यातील ऑक्सिजन 20 मिनिटेच पुरले इतका होता. झोपेत असल्याकारणानं काही जणांना त्यावेळी मास्कही ओढता आले नाहीत. त्यानंतर काही वेळातच ते मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाजही विल्सन यांनी वर्तवला होता.