सुरक्षा परिषद; कालबद्ध सुधारणा हवी
By admin | Published: September 26, 2015 10:00 PM2015-09-26T22:00:20+5:302015-09-26T22:00:20+5:30
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मानसिकता आजची नाही, तर गेल्या शतकातील आहे. दहशतवाद आणि हवामान बदल या नव्या आव्हानांशी ती सुसंगत नाही,
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मानसिकता आजची नाही, तर गेल्या शतकातील आहे. दहशतवाद आणि हवामान बदल या नव्या आव्हानांशी ती सुसंगत नाही, असा घणाघात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सुरक्षा परिषदेत कालबद्ध सुधारणेची गरज असल्याचे जोर देऊन सांगितले.
जी-४च्या (सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वाचे प्रमुख दावेदार भारत, जर्मनी, जपान व ब्राझील यांचा गट) शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही, जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे घटक व सर्व प्रमुख खंडांचे प्रतिबिंब उमटेल अशा रीतीने तिच्यात सुधारणा व्हायला हवी. तसे झाल्यास सुरक्षा परिषद २१ व्या शतकातील आव्हानांच्या निपटाऱ्यासाठी अधिक प्रातिनिधिक आणि अधिक परिणामकारक बनेल. या परिषदेला जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, जपानी पंतप्रधान शिन्झो अॅबे, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौसेफ यांची उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)