टीव्हीवर नंबर पाहून लॉटरी घेतली, एका रात्रीत बनला कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:30 PM2021-09-01T14:30:43+5:302021-09-01T14:44:49+5:30
lottery ticket news: अमेरिकेत टीव्हीवर लॉटरी शो घेतले जातात. त्या शोमध्ये लॉटरी जिंकण्यासाठी काही नंबर सेट निवडावे लागतात.
कधीकधी आपण नकळत असं काही करतो, ज्यामुळे आपलं भाग्य अचानक उजळून निघतं. लॉटरीचा खेळदेखील असा आहे. नशीब कधी चमकेल हे कोणालाही माहित नाही. अशीच एक घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामध्ये घडली आहे. येथील एका व्यक्तीनं एका टीव्ही शोमधील नंबर वापरुन कोट्यधीश झाल्याची घटना घडली आहे.
यूपीआय न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामधील एका व्यक्तीने लॉटरी ड्रॉइंगमधून $ 200,000 (अंदाजे 1.46 लाख रुपये) बक्षीस जिंकलं आहे. यासाठी त्या व्यक्तीनं जो नंबर वापरला, तो त्यानं एका टीव्ही शोमध्ये पाहिला होता. तो नंबर वापरुन त्यानं ही लॉटरी खेळली आणि यात त्याचा विजय झाला. ही लॉटरी जिंकल्यानंतर त्या व्यक्तीनं त्या टीव्ही शो चे आभार मानले.
अशी केली नंबरची निवड
अमेरिकेत टीव्हीवर लॉटरी शो घेतले जातात. त्या शोमध्ये लॉटरी जिंकण्यासाठी काही नंबर सेट निवडावे लागतात. साउथ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीने सांगितल्यानुसार, लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीनं चेस्टरफील्डमधील पिग्ली विग्ली स्टोअरमधून 'पाल्मेटो कॅश 5' तिकीट खरेदी केलं आणि 1-10-16-17 हा क्रमांक निवडला. हाच नंबर त्या लॉटरीमध्ये आला.