स्तनाच्या कर्करोगावरील उपचार शोधला
By admin | Published: August 29, 2016 06:36 AM2016-08-29T06:36:03+5:302016-08-29T06:36:03+5:30
स्तनाच्या कर्करोगावरील (ब्रेस्ट कॅन्सर) उपचार शोधल्याचा दावा भारतीय वंशाच्या इंग्लडमध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या के. नित्यानंदम याने केला आहे
लंडन : स्तनाच्या कर्करोगावरील (ब्रेस्ट कॅन्सर) उपचार शोधल्याचा दावा भारतीय वंशाच्या इंग्लडमध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या के. नित्यानंदम याने केला आहे. स्तनाचा कर्करोग हा औषधांना जुमानत नाही, अशी या रोगाची कुख्याती आहे.
के. नित्यानंदम हा त्याच्या पालकांसोबत भारतातून इंग्लडमध्ये आला. स्तनाचा ट्रिपल निगेटिव्ह कर्करोग औषधांना प्रतिसाद देईल, असा मार्ग मी शोधला आहे, अशी त्याची आशा आहे.
अनेक स्तनाचे कर्करोग हे ओएस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन किंवा रसायनांची वाढ यामुळे पुढे सरकतात. टॅमोक्सिफेन यासारख्या औषधांमुळे त्यांचा मार्ग रोखला जाऊन प्रभावी उपचार होऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरला असा कोणताही अवयव किंवा पेशी नाही, त्यामुळे त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे, शस्त्रक्रिया, किरणोत्सर्ग आणि केमोथेरपी यांचा संयोग. या उपचाराने रुग्ण वाचण्याची शक्यता कमी होते.
उपचार करण्यास अवघड असलेले कर्करोग उपचारांना प्रतिसाद देतील, असे त्यांचे स्वरूप करण्याचा मी मूलभूतपणे प्रयत्न करीत आहे, असे नित्यानंदम म्हणाले. (वृत्तसंस्था)बहुतेक कर्करोगांना त्यांच्या पृष्ठभागावर अवयव किंवा पेशी असतात व ते टॅमोक्सिफेमसारखी औषधे स्वीकारतात, परंतु ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सरला असे रिसेप्टर्स नसल्यामुळे औषधे काम करीत नाहीत, असे नित्यानंदम म्हणाल्याचे वृत्त ‘द संडे टेलिग्राफ’ने दिले आहे.
भारतात स्तनाचा कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ मुंबईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास ३० टक्के होते़ याशिवाय स्तनाचा कर्करोग होण्याचे वयही कमी होत असून, पंचवीस वर्षांपूर्वी हा रोग सरासरी ३३ व्या वर्षी आढळत होता़ आता ह्या रोगाचे निदान होण्याचे वय २२ वर आले आहे.