सीमा हैदर लवकरच देणार गुड न्यूज; मुलगा होणार की मुलगी? सासऱ्याने हात बघून केला 'हा' दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:25 PM2024-01-01T15:25:32+5:302024-01-01T15:28:09+5:30

सीमा हैदर आता लवकरच गुड न्यूज देणार असून ती सचिनच्या मुलाची आई बनणार आहे.

Seema Haider will give good news soon | सीमा हैदर लवकरच देणार गुड न्यूज; मुलगा होणार की मुलगी? सासऱ्याने हात बघून केला 'हा' दावा

सीमा हैदर लवकरच देणार गुड न्यूज; मुलगा होणार की मुलगी? सासऱ्याने हात बघून केला 'हा' दावा

Seema Haider ( Marathi News ) : सरत्या वर्षात भारतात एका लव्ह स्टोरीची प्रचंड चर्चा झाली. देशाच्या सीमारेषा ओलांडून सीमा हैदर नामक पाकिस्तानी विवाहित महिला आपल्या चार मुलांसह सचिन या तिच्या प्रियकराच्या भेटीसाठी आली आणि इथेच राहिली. पाकिस्तानातून गुप्तपणे नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमाची एंट्री वादग्रस्तही ठरली होती. अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशाच्या सुरक्षेशीही या प्रकरणाला जोडलं होतं. मात्र हीच सीमा हैदर आता लवकरच गुड न्यूज देणार असून ती सचिनच्या मुलाची आई बनणार आहे. याबाबतची माहिती स्वत: सीमा हिनेच एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे.

सचिन आणि माझं एक मूल व्हावं, अशी माझी इच्छा असल्याचं या मुलाखतीत सीमा हैदरनं म्हटलं आहे. तसंच सचिनच्या वडिलांनीही याबद्दल आनंद व्यक्त करत मी माझ्या सुनेचा हात बघितला असून तिला मुलगाच होईल, अशी भविष्यवाणीही करून टाकली आहे. मी आतापर्यंत हात पाहून जेव्हा जेव्हा अंदाज व्यक्त केला आहे, त्यातील एकही अंदाज चुकीचा ठरलेला नाही, असा दावा सचिनचे वडील आणि सीमाच्या सासऱ्यांनी केला आहे.

कशी झाली होती सीमाची एंट्री?

तरुणांमध्ये पबजी ही मोबाईल गेम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली होती. याच पबजी गेमच्या माध्यमातून सीमा आणि सचिनचीही ओळख झाली. नंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आपल्या पतीला सोडून देत सीमा थेट पाकिस्तानातून भारतात निघाली. सीमाने नेपाळमार्गे भारतात दाखल होत उत्तर प्रदेशात असणारं सचिनचं गाव गाठलं.

दरम्यान, भारतात आलेल्या सीमावर पाकिस्तानी एजंट असल्याचाही आरोप झाला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनीही तिची चौकशी केली होती.
 

Web Title: Seema Haider will give good news soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.