भूकंपाची तीव्रता २० अणुबॉम्ब स्फोटाइतकी

By admin | Published: April 27, 2015 11:23 PM2015-04-27T23:23:01+5:302015-04-27T23:23:01+5:30

शनिवारी नेपाळला बसलेला ७.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर बसणारे कमी अधिक तीव्रतेचे धक्के यात होणाऱ्या नुकसानीची तीव्रता जास्त आहे.

Seismic intensity of 20 atom bomb explosion | भूकंपाची तीव्रता २० अणुबॉम्ब स्फोटाइतकी

भूकंपाची तीव्रता २० अणुबॉम्ब स्फोटाइतकी

Next

काठमांडू : शनिवारी नेपाळला बसलेला ७.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर बसणारे कमी अधिक तीव्रतेचे धक्के यात होणाऱ्या नुकसानीची तीव्रता जास्त आहे.
हिमालय जवळ असल्याने या भागाला बसणारे धक्के जास्त तीव्रतेचे असतात हे कारण आहेच; पण तज्ज्ञांच्या मते शनिवारी बसलेला ७.९ तीव्रतेच्या भूकंपात बाहेर पडलेली ऊर्जा इतकी प्रचंड होती, की त्याची तुलना २० अणुबॉम्बच्या स्फोटाइतकी होती. अणुबॉम्बने हिरोशिमा शहर बेचिराख केले. त्याहून अधिक हानी या भूकंपाने होण्याची शक्यता आहे.


भारतातील ५९ टक्के भूभागाला भूकंपाचा धोका आहे. या भागात भूकंपाने मोठी हानी होऊ शकते. हा भाग भूकंपप्रवण म्हणून ओळखला जातो.

भूकंपाची तीव्रता कशी मोजतात
भूकंप झाल्यानंतर सेस्मिक लहरींच्या रूपात ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा मोजण्यासाठी सेस्मोमीटर वापरले जाते. दीर्घकाळापर्यंत भूकंपाची तीव्रता रिश्टर मापकावर मोजली जात असे. पण हे मापक कॅलिफोर्नियातील स्थितीवर आधारित होते. त्यामुळे भूकंप मोजण्यासाठी ते योग्य समजले जात नाही.

Web Title: Seismic intensity of 20 atom bomb explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.