रोबो करू शकणार स्वयंभू हालचाली

By admin | Published: May 7, 2015 01:07 AM2015-05-07T01:07:44+5:302015-05-07T01:07:44+5:30

आकार बदलून अंतर्गत ऊर्जेच्या वापराने हालचाली करणारा यंत्रमानव (रोबो) विकसित करणे शक्य असल्याचा दावा पीटस्बर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केली.

Self-directed movements can be robot | रोबो करू शकणार स्वयंभू हालचाली

रोबो करू शकणार स्वयंभू हालचाली

Next

वॉशिंग्टन : आकार बदलून अंतर्गत ऊर्जेच्या वापराने हालचाली करणारा यंत्रमानव (रोबो) विकसित करणे शक्य असल्याचा दावा पीटस्बर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केली. या शास्त्रज्ञांनी सिन्थेटिक पॉलिमर जेल (संश्लेषणप्रवण बहुवारिक जेल) तयार केला असून त्यामुळे यंत्रमानवाला (रोबो) मानवाप्रमाणे अंतर्गत ऊर्जेचा वापर करून (स्नायू प्रसरण आणि आकुंचन) हालचाली करता येतील.
स्नायंूचे प्रसरण आणि आकुंचन ही जैविक क्रिया आहे. मानवी शरीरातील पेशींमुळे ही क्रिया होत असते. यामुळे सजीवांना अन्नाचा शोध घेण्यासह संकटात पळ काढता येतो; परंतु सिन्थेटिक पदार्थात अशा प्रकारच्या स्वयंभू यांत्रिकी हालचाली करण्याची किंवा अशा हालचालींसाठी अंतर्गत ऊर्जा साठवण्याची क्षमता नसते. नवीन संगणन प्रणाली विकसित करून संशोधकांनी प्रकाशाचा वापर करून विविध आकार धारण करणारी सिन्थेटिक पॉलिमर जेल १९९० मध्ये विकसित केली. ही जेल ठराविक मुदतीसाठी स्पंदन वा कंपनासोबत प्रकाश संश्लेषणाद्वारे हालचाल करू शकते. (वृत्तसंस्था)
----------
क्रियाकारक द्रवाचा पुरवठा केल्यास अंतर्गत रासायनिक प्रक्रियेतून ही जेल (बीझेड) स्वयंभू हालचाल करू शकते, असा दावा पीटस्बर्ग विद्यापीठाचे अ‍ॅना सी. बॅलाज्स आणि ओल्गा कुकसेनॉक यांनी केला आहे.

खनिज किंवा मिश्र धातूंऐवजी यंत्रमानव तयार करण्यासाठी पॉलिमर जेलचा वापर केल्यास यंत्रमानवाचे वजन कमी होईल व यंत्रमानवाला स्वयंभूपणे हालचाली करता येतील, असे ओल्गा कुकसेनॉक यांनी नमूद केले आहे.

Web Title: Self-directed movements can be robot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.