सेल्फी शार्कच्या हल्ल्याहून घातक
By admin | Published: September 23, 2015 10:24 PM2015-09-23T22:24:48+5:302015-09-23T22:24:48+5:30
‘सेल्फी’ शार्कहून घातक ठरत आहे. यावर्षी जगभरात सेल्फी घेण्याच्या नादात १२ जण मृत्युमुखी पडले असून ‘सेल्फी’बळींची ही संख्या शार्क हल्ल्यातील मृतांच्या संख्येहून अधिक आहे.
Next
वॉशिंग्टन : ‘सेल्फी’ शार्कहून घातक ठरत आहे. यावर्षी जगभरात सेल्फी घेण्याच्या नादात १२ जण मृत्युमुखी पडले असून ‘सेल्फी’बळींची ही संख्या शार्क हल्ल्यातील मृतांच्या संख्येहून अधिक आहे.
जगभरात २०१५ मध्ये आतापर्यंत १२ लोक सेल्फी घेताना मृत्युमुखी पडले, तर शार्कच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या केवळ आठ आहे. अलीकडेच ताजमहालमध्ये सेल्फी घेताना पायऱ्यांवरून खाली पडून ६६ वर्षांच्या जपानी नागरिकाचा मृत्यू झाला होता. यावर्षी सेल्फीमुळे झालेल्या चार मृत्यूंना जपानी पर्यटकासारखीच दुर्घटना कारणीभूत ठरली, असे एका अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)