डेटींगसाईटच्या डाटाची चोरी करुन ऑनलाइन विक्री
By admin | Published: April 27, 2016 10:27 AM2016-04-27T10:27:39+5:302016-04-27T13:04:45+5:30
विवाह, प्रेमसंबंध जुळवणारी डेटिंग वेबसाईट ब्युटीफुल पीपलवरील डाटाची चोरी झाली आहे. या डाटाची चोरी करुन ऑनलाइन विक्री करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २७ - विवाह, प्रेमसंबंध जुळवणारी डेटिंग वेबसाईट ब्युटीफुल पीपलवरील डाटाची चोरी झाली आहे. या डाटाची चोरी करुन ऑनलाइन विक्री करण्यात आली. चोरी झालेल्या डाटामध्ये ब्युटीफुल पीपलवर नोंदणी करणा-या लाखो सदस्यांची खासगी माहिती आहे. सदस्यांची वजन, उंची, नोकरी आणि फोन नंबरच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे.
जुलै २०१५ पूर्वी नोंदणी करणा-यांच्या माहितीची चोरी झाल्याचे ब्युटीफुल पीपलने सांगितले. ज्या डाटाची चोरी झाली त्यामध्ये पासवर्ड किंवा आर्थिक माहिती नव्हती. डाटा चोरी झाल्याचे संगणक सुरक्षा तज्ञ ख्रिस विकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी ब्युटीफुल पीपलला माहिती दिली. कंपनीनेही तात्काळ पावले उचलली पण तो पर्यंत उशीर झाला होता. डाटाची ऑनलाइन विक्री झालेली होती. टेस्ट सर्व्हरमधून या डाटाची चोरी करण्यात आली.
ब्युटीफुल पीपलवर अशी नोंदणी होते
ब्युटीफुल पीपलचे सदस्यत्व मिळवण्यासाठी वापरकर्त्याला त्याचे फोटो संकेतस्थळाला पाठवावे लागतात. त्या फोटोंवर व्होटींग होते. ठरवलेल्या मानकानुसार दोन दिवसात पुरेशी मते मिळाली तर, त्याला ब्युटीफुल पीपलचे सदस्यत्व मिळते.