ओबामांच्या प्रयत्नांत सिनेटचा खोडा
By admin | Published: December 3, 2015 03:18 AM2015-12-03T03:18:28+5:302015-12-03T03:18:28+5:30
हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनास आळा घालण्यासाठी ओबामा प्रशासनाने तयार केलेली नवी नियमावली अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेने फेटाळली आहे.
ली बुर्गेत (पॅरिस) : हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनास आळा घालण्यासाठी ओबामा प्रशासनाने तयार केलेली नवी नियमावली अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेने फेटाळली आहे. ओबामांना नकाराधिकार (व्हेटो) वापरून ही नियमावली लागू करावी लागेल, अशी चिन्हे आहेत. रिपब्लिकन्स सदस्यांनी मंगळवारी ओबामांच्या या नियमांच्या विरोधात मत दिले.
ओबामांच्या नियमांना नामंजूर करणारे ठराव रिपब्लिकनांचे नियंत्रण असलेल्या सिनेटने मंजूर केले असले तरी ते मुळात सांकेतिक आहेत, तरीही ओबामा प्रशासनाची त्याने खरडपट्टी काढली आहे. ओबामा या ठरावांवर आपला नकाराधिकार वापरतील व या नकाराधिकाराला डावलण्यासाठी काँग्रेसकडे पुरेशी मते नाहीत, असे व्हाईट हाऊसने म्हटले. हवामान बदल परिषदेत ओबामा यांच्या या भूमिकेला कोळसा, तेल आणि गॅस जाळून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाला कमी करण्यासाठी करार व्हावा अशी इच्छा असलेल्या देशांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसची मंजुरी नसतानाही ओबामांनी हा करार लागू करण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन सदस्यांचा विरोध प्रखर होऊ शकतो. अमेरिकन प्रशासनाने २०२५ पर्यंत कार्बन उत्सर्जन २८ टक्क्यांनी घटविण्याचा संकल्प आंतरराष्ट्रीय परिषदांदरम्यान केला आहे; परंतु पॅरिस करारातील उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ओबामांना हा प्रस्ताव काँग्रेसमध्ये मांडावा लागेल व तेथे त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता नाही.
रिपब्लिकनच्या अनेक नेत्यांनी तापमानाच्या वस्तुस्थितीबद्दल संशय व्यक्त केला आहे व त्यांना कठोर प्रदूषण नियमांमुळे नोकऱ्यांची संख्या कमी होण्याची भीती वाटते. प्रशासन लक्ष्य गाठण्यासाठी देशांनी कधी आणि वेळोवेळी कसा आपल्या लक्ष्याचा आढावा घेतला पाहिजे,अशी भूमिका घेऊन कठोर नियमांच्या बाहेर यायच्या प्रयत्नांत आहे. (वृत्तसंस्था)