Senegal Bus Accident: सेनेगलमध्ये भीषण अपघात! 40 जण ठार, 87 जखमी, देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:32 AM2023-01-09T00:32:36+5:302023-01-09T00:34:33+5:30
आफ्रिकन देश सेनेगलमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे दोन बसची समोरासमोर धडक झाली, या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला तर 87 जण जखमी झाले.
आफ्रिकन देश सेनेगलमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे दोन बसची समोरासमोर धडक झाली, या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला तर 87 जण जखमी झाले. मध्य सेनेगलमधील काफ्रीनमध्ये ही घटना घडली. ही घटना रविवारी पहाटे 3.15 वाजता राष्ट्रीय मार्ग क्रमांक 1 वर घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 40 लोकांसाठी राष्ट्राध्यक्ष मॅकी सॅल यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. बसमध्ये 60 लोकांची आसनक्षमता होती. बस मॉरिटानियाच्या सीमेजवळील रोसोला जात होती. यात किती जण प्रवास करत होते याची माहिती मिळालेली नाही.
'हा एक गंभीर अपघात होता. या घटनेत 87 जण जखमी झाले आहेत. पीडितांना काफिरमधील हॉस्पिटल आणि वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे.अपघात बसला बाहेर काढण्यात आले आहे. वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सरकारी वकील शेख दिएंग यांनी दिली.
टायर फुटल्याने बसचा तोल गेला. यामुळे तिची विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडक बसली. 'या दुःखद रस्ता अपघातामुळे मला खूप दु:ख झाले आहे. मी पीडितांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो, असं ट्विट राष्ट्रपती सोल यांनी केले. देशात अलीकडच्या काही वर्षांत अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.
सेनेगलमध्ये बेशिस्तपणे वाहन चालवणे यासोबतच खराब रस्ते आणि कोंडी झालेल्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. ऑक्टोबर 2020 मध्येही एक मोठी दुर्घटना घडली होती.
Deux bus sont entrés en collision à hauteur de la localité de Sikolo, dans la région de #kaffrine, faisant au moins 38 morts et une centaine de blessés #PressAfrik#Sénégal#accident#kebetupic.twitter.com/omUt1XXHyi
— Salif Sakhanokho (@salifsakhanokho) January 8, 2023