मानवतेसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधींचे कराचीत निधन

By admin | Published: July 9, 2016 08:01 AM2016-07-09T08:01:03+5:302016-07-09T08:06:30+5:30

पघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताचा पोटच्या मुलीप्रमाणे जपणारे व तिच्यासह अशा अनेक अश्राप जीवांचा सांभाळ करणारे पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधींचे निधन झाले.

Senior Sena worker Abdul Sattar Idhi dies in Karachi | मानवतेसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधींचे कराचीत निधन

मानवतेसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधींचे कराचीत निधन

Next

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. ९ - पंधरा वर्षांपूर्वी अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताचा पोटच्या मुलीप्रमाणे जपणारे व तिच्यासह अशा अनेक अश्राप जीवांचा सांभाळ करणारे पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचे निधन झाले. 'केवळ मानवतेसाठी' झटणारी व्यक्ती अशी ओळख असणा-या ईधी यांनी वयाच्या ८८व्या वर्षी कराचीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या ईधी यांच्यावर कराचीतील मेडिकलमध्ये उपचार सुरू होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. 
१ जानेवारी १९२८ साली भारतातील बंतवा येथे जन्म झाला मात्र फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. ईधी यांनी लहान वयातच आपले जीवन समाजसेवेसाठी वाहून घेत गरीबांसाठी काम सुरू केले होते. जवळपास 60 वर्षांपूर्वी त्यांनी 'वेलफेअर' फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरूवात केली. त्यानंतर अनाथाश्रम, नर्सिंग होम, दवाखाने, वुमन शेल्टर व पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी गरजू व गरीबांची सेवा केली व त्यासाठी ईधी फाऊंडेशनचीही स्थापना केली. पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये ईधी फाऊंडेशनचे काम अव्याहतपण सुरू आहे. 
१९४८ साली अब्दुल सत्तार ईधी यांनी मिठादर येथे धर्मदाय दवाखाना सुरु केला. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्तांसाठी सेवा-सुविधा पुरवत त्याचं मोठ्ठ जाळ विणून गरजूंची अथक मदत केली. निस्वार्थ व निरलसपणे काम करणा-या कार्यकर्त्यांची फळी ईधींनी उभारली असून भूकंप, पूर यासारखे निसर्गनिर्मित वा कोणतेही मानवनिर्मित संकट असो, संकटग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारपूर्वी ईधी फाऊंडेशनचे कार्यकर्ते मदतीस पोहोचलेले असतात. विशेष बाब म्हणजे ईधी फाऊंडेशनने कोणताही राजकीय पक्ष वा नेत्यांकडून कधीच देणगी स्वीकारली नाही. 
मानवतेसाठी अखंड झटणा-या अब्दुल सत्तार ईधी यांना १९८६ साली मानाचा समजला जाणारा 'रॅमन मॅगेसेसे', तर १९८८ साली 'लेनिन पीस प्राईज' पुरसक्रा देण्यात आला तसेत यांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही गौरवण्यात आले. 
 
भारतीय गीताचाही केला १५ वर्ष सांभाळ
अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताला ईधी यांनीच सांभाळले होते, ते तिला आपल्या मुलीसारखेच मानत असत.  पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सना लाहोर रेल्वेस्थानकावर आलेल्या समझोता एक्स्प्रेसच्या एका डब्यात गीता एकटीच बसलेली आढळली होती. पोलिसांनी तिला लाहोरमधील इधी फाऊं डेशनच्या स्वाधीन केले होते आणि नंतर तिला कराचीला नेण्यात आले होते. त्यानंतर अखेर पालकांची ओळख पटल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गीता भारतात परतली होती. 
 
 आणखी वाचा : 
(...अखेर गीता पाकिस्तानातून भारतात सोमवारी परतणार)
(भारत पाकिस्तानला पाठवणार 'रमझान'ची भेट)
  •  
 
  •  
 
 

 

Web Title: Senior Sena worker Abdul Sattar Idhi dies in Karachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.