बलात्कारी बापाला दीड हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

By admin | Published: October 25, 2016 02:25 PM2016-10-25T14:25:23+5:302016-10-25T14:51:13+5:30

कॅलिफॉर्नियातील फ्रेस्नो येथे स्वतःच्या मुलीवर 4 वर्ष बलात्कार करणा-या एका बापाला तब्बल दीड हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Sentenced to one and a half year imprisonment for raping father | बलात्कारी बापाला दीड हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

बलात्कारी बापाला दीड हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Next

ऑनलाइन लोकमत

फ्रेस्नो, दि. 25 -  स्वतःच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणा-या एका वासनांध बापाला तब्बल दीड हजार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा नराधम चार वर्षांपासून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. कॅलिफॉर्नियातील फ्रेस्नो येथील ही धक्कादायक घटना आहे. फ्रेस्नो सुप्रीम कोर्टाने या खटल्याप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला असून, कोर्टाच्या इतिहासातील आतापर्यंतच्या शिक्षांमधील ही सर्वात प्रदीर्घ तुरुंगवासाची शिक्षा असल्याचे म्हटले जात आहे. 
 
41 वर्षांचा हा आरोपी 2009 ते 2013पर्यंत स्वतःच्याच मुलीवर आठवड्यातून दोन ते तीन वेळा बलात्कार करत होता. याआधी या पीडित मुलीवर त्याच्याच जवळच्या नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केले होते. मात्र या घटनेनंतर तिचे संरक्षण करण्याऐवजी त्याने तिचाच गैरफायदा घ्यायला सुरुवात केल्याचे पीडित मुलीच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितले. 
 
दरम्यान, हा व्यक्ती समाजासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे न्यायाधीशांनी शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच केलेल्या कुकृत्याबाबत आरोपीला अजिबात पश्चाताप झालेला नसून घटनेसाठी त्याने स्वतःच्या मुलीलाच जबाबदार ठरवले आहे, असेही कोर्टाने सांगितले. 
 
'ज्यावेळी वडिलांना माझा लैंगिक छळ करायला सुरुवात केली, त्यावेळी मी लहान होते. त्यांना विरोध करायला माझ्याकडे ताकद नव्हती, मी निराधार होते', अशी खंत या पीडित मुलीने व्यक्त केली, दरम्यान ही मुलगी आता 23 वर्षांची झाली आहे. मात्र, न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत पीडित मुलीला न्याय मिळवून दिला आहे. 
 

Web Title: Sentenced to one and a half year imprisonment for raping father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.