सेरेनाने शारापोवाला मागे टाकले

By admin | Published: June 8, 2016 04:36 AM2016-06-08T04:36:57+5:302016-06-08T04:36:57+5:30

ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने कमाईच्या बाबतीत मात्र जबरदस्त आघाडी मिळवली

Serena has surpassed Sharapova | सेरेनाने शारापोवाला मागे टाकले

सेरेनाने शारापोवाला मागे टाकले

Next


लॉस एंजेलिस : यंदाच्या मोसमात अनपेक्षितपणे सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने कमाईच्या बाबतीत मात्र जबरदस्त आघाडी मिळवली आहे. या वेळी तिने तब्बल ११ वर्षे कमाईच्या बाबतीत अग्रस्थान राखलेल्या रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोवाला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली.
एका नामांकित मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार सेरेनाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या वेळी तिने एकेकाळी याबाबतीत अग्रस्थान राखलेल्या आणि सध्या डोपिंगमुळे अनिश्चित काळासाठी बंदीला सामोरी गेलेल्या मारिया शारापोवाला पिछाडीवर टाकले.
अमेरिकेची मिक्स मार्शल आर्ट खेळाडू रोंडा रोसी हिने जबरदसत मुसंडी मारताना १.४ कोटी डॉलरच्या कमाईसह आठव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी कब्जा केला. तर तिच्यानंतर नास्कार ड्रायव्हर डॅनिका पैट्रीक (१.३० कोटी डॉलर) चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे अव्वल १० खेळाडूंमध्ये टेनिसपटूंचा अधिक समावेश आहे.(वृत्तसंस्था)
>गेल्या १२ महिन्यांत सेरेनाने खेळाच्या माध्यमातून आणि त्याव्यतिरिक्त सुमारे २.८९ कोटी डॉलरची कमाई केली आहे.
शारापोवा कमाईच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानी कायम होती. मात्र डोपिंगमध्ये नाव आल्यापासून तिच्या कमाईमध्ये कमालीची घसरण झाली. तरीदेखील ती २.१९ कोटी डॉलरच्या कमाईसह द्वितीय स्थानी आहे.
पोलंडची एग्निज्स्का रदवांस्का (१.०२ कोटी) पाचव्या, डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाका (८० लाख), फ्रेंच ओपन विजेती स्पेनची गरबाइन मुगुरुजा (७६ लाख), सर्बियाची अ‍ॅना इवानोविच (७४ लाख), बेलारुसची व्हिक्टोरिया अजारेंका (६६ लाख) आणि कॅनडाची युजिनी बुकार्ड ((६२ लाख) यांचा समावेश आहे.

Web Title: Serena has surpassed Sharapova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.