'या' देशाच्या संसदभवनाजवळ साखळी बॉम्बस्फोट, अवघ्या 100 मीटर अंतरावर होता भारतीय संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:22 PM2021-11-16T17:22:09+5:302021-11-16T17:23:12+5:30

मिळालेल्या माहितीनुसार एक स्फोट पोलिस स्टेशन आणि दुसरा संसद भवनाच्या इमारतीजवळ झाला.

serial blast near assembly in ugandas capital kampala, Indian team was just 100 meters away when a chain bomb exploded | 'या' देशाच्या संसदभवनाजवळ साखळी बॉम्बस्फोट, अवघ्या 100 मीटर अंतरावर होता भारतीय संघ

'या' देशाच्या संसदभवनाजवळ साखळी बॉम्बस्फोट, अवघ्या 100 मीटर अंतरावर होता भारतीय संघ

googlenewsNext

कंपाला : आफ्रिकन देश युगांडा सीरियल ब्लास्टने हादरले. युगांडाची राजधानी कंपालामध्ये संसद भवनाजवळ झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले. भारतीय पॅरा बॅडमिंटन संघ स्फोटाच्या ठिकाणापासून केवळ 100 मीटर अंतरावर होते. सुदैवाने या स्फोटात भारतीय संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही. भारतीय पॅरा बॅडमिंटन संघ काही दिवसांपूर्वीच पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल-2021 मध्ये सहभागी होण्यासाठी युगांडा येथे पोहोचला आहे. या संघात टोकियो पॅरालिम्पिक-2021 मधील पदक विजेते प्रमोद भगत, मनोज सरकार आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.

इमारतीला लक्ष्य करून स्फोट घडवला

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक स्फोट पोलिस ठाण्याजवळ झाला आणि दुसरा स्फोट संसद भवनाजवळ रस्त्याच्या कडेला झाला.संसदेजवळील स्फोट हा विमा कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीला लक्ष्य करुन करण्यात आला असावा. स्फोटामुळे तेथे उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. नॅशनल ब्रॉडकास्टर यूबीसीच्या म्हणण्यानुसार, स्फोट झाल्यानंतर काही खासदार संसद भवनाच्या संकुलातून बाहेर पडताना दिसले.

सातत्याने स्फोट होत आहेत
दुसऱ्या जागेजवळ उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस स्टेशनजवळ धूर निघताना दिसत आहे. स्फोट बॉम्बमुळे झाला की अन्य कोणत्या गोष्टीमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. युगांडाचे अधिकारी यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहेत. 23 ऑक्टोबर रोजी कंपाला येथील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता आणि किमान सात जण जखमी झाले होते.

 

Web Title: serial blast near assembly in ugandas capital kampala, Indian team was just 100 meters away when a chain bomb exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.