संशयित आत्मघाती हल्ल्यात सात ठार

By admin | Published: January 13, 2017 02:49 AM2017-01-13T02:49:18+5:302017-01-13T02:49:18+5:30

सिरियाची राजधानी दमास्कसच्या दक्षिण भागात झालेल्या भीषण आत्मघाती बॉम्ब

Seven killed in suspected suicide attack | संशयित आत्मघाती हल्ल्यात सात ठार

संशयित आत्मघाती हल्ल्यात सात ठार

Next

 ऑनलाइन लोकमत
दमास्कस, दि. 13 -  सिरियाची राजधानी दमास्कसच्या दक्षिण भागात झालेल्या भीषण आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात सात जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली.  अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या कफ्र सौसा भागात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.  या घटनेत मृत्युमुखी पडलेल्याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविन्यात येतआहे. घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला असून अनेक कार व अन्य वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यासह नागरिक जखमी झाले आहेत. 

जुलै महिन्यात याच भागात  कार स्फोट झाला होता. त्यावेळीही अनेकाना प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Seven killed in suspected suicide attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.