...म्हणून सेक्स डॉल्स सोबत राहतात 'हे' पिता-पुत्र

By admin | Published: February 8, 2017 11:06 AM2017-02-08T11:06:43+5:302017-02-08T11:14:16+5:30

सध्या पुरुषांमध्ये सिलीकॉन डॉल्सचे क्रेज वाढत चालले आहे. जिवंत महिलांपेक्षा निर्जीव सेक्स डॉल्समध्ये त्यांचा जीव गुंतत चालला आहे.

... as sex couples live together with 'O' father-son | ...म्हणून सेक्स डॉल्स सोबत राहतात 'हे' पिता-पुत्र

...म्हणून सेक्स डॉल्स सोबत राहतात 'हे' पिता-पुत्र

Next

ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 8 - सध्या चीनच्या पुरुषांमध्ये सिलीकॉन डॉल्सचे क्रेज वाढत चालले आहे. जिवंत महिलांपेक्षा निर्जीव सेक्स डॉल्समध्ये त्यांचा जीव गुंतत चालला आहे. घरातल्या पत्नीचा दर्जा ते या सेक्स डॉल्सना देत आहेत.  ली चेन अशाच पुरुषांपैकी एक आहेत जे डॉल्सच्या प्रेमात आहेत. 
 
ली यांच्याकडे एक नाही तर, तब्बल सात डॉल्स आहेत. 59 वर्षाचे ली चेन आपल्या घरात सात सेक्स डॉल्ससोबत राहतात. त्यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर सेक्स डॉल्स गोळा करायला सुरुवात केली. ली यांनी या डॉल्सवर आतापर्यंत एक लाख रुपये खर्च केले आहेत. 
पत्नीच्या मृत्यूनंतर आणि मुलगा कॉलेजला गेल्यानंतर एकटेपणा खायला उठायचा. त्यावेळी त्यांनी मन रमवण्यासाठी पहिली सेक्स डॉल खरेदी केली. संजीव माणसाबरोबर राहण्यापेक्षा डॉल्स बरोबर राहणे केव्हाही चांगले कारण त्या फसवत नाहीत असे ली यांचे मत आहे. 
 
पत्नीच्या मृत्यूनंतर ली अनेक महिलांना भेटले पण कुठल्याही महिलेबरोबर त्यांचे संबंध दीर्घकाळ टिकले नाहीत. ली यांनी आपल्या मुलालाही एक सेक्स डॉल भेट म्हणून दिली होती. पण त्यांचा मुलगा यांग यांगने सर्व डॉल्सना आपली बहिण मानले आहे. 
 

Web Title: ... as sex couples live together with 'O' father-son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.