रेंटच्या बदल्यात घरमालकाने तरूणीसोबत ठेवले शारीरिक संबंध, आता मिळाली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 04:59 PM2022-05-12T16:59:52+5:302022-05-12T17:01:02+5:30
UK : ५३ वर्षीय क्रिस्टोफर कॉक्सने एका तरूणी त्याच्या घरात फ्रीमध्ये राहण्याची ऑफर दिली. पण यासाठी त्याने एक अट ठेवली की, महिलेला त्याच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवावे लागतील.
एका मकान मालकाने तरूणींना आपल्या घरी फ्रीमध्ये राहण्यासाठी बोलवलं. मग त्यांना घरात सतत बिकीनीमध्ये राहण्यात सांगितलं आणि इतकंच नाही तर सोबत झोपण्यासही सांगितलं. आता या व्यक्तीवर कारवाई झाली आहे. तो सेक्स फॉर रेंट प्रकरणात दोषी आढळला आहे. सेक्स फॉर रेंट प्रकरणात ब्रिटनमधील ही पहिली शिक्षा आहे. असं मानलं जातं की, अशी अनेक घरं आहेत जिथे महिलांचं शोषण केलं जातं.
५३ वर्षीय क्रिस्टोफर कॉक्सने एका तरूणी त्याच्या घरात फ्रीमध्ये राहण्याची ऑफर दिली. पण यासाठी त्याने एक अट ठेवली की, महिलेला त्याच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवावे लागतील. गिल्डोफोर्ड क्राउन कोर्टात सुनावणी दरम्यान या गोष्टीचाही खुलासा करण्यात आला की, त्याने महिलेला घरात केवळ बिकीनी घालण्यासाठी भाग पाडलं.
टीव्ही सीरीज The Kyle Files साठी सेक्स फॉर रेंट प्रकरणाचं इन्वेस्टिगेशन करताना ITV Researcher ना या प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यांच्या हाती एक जाहिरात लागली. यात 'a girl in need' टार्गेट करण्यात आलं होतं.
पोस्टमध्ये लिहिलं होतं की, तू १६ वयापेक्षा जास्त वयाची तरूणी आहे का जी घरात अडकून पडली आहे आणि तुला बाहेर निघायचंय? होऊ शकतं की तू बेघर असशील आणि एका सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असतील? माझ्याकडे १८ ते २८ वयाच्या तरूणीसाठी फ्रीमध्ये रूम आहे'.
जेरेमी काइल द्वारे हे प्रकरण समोर आणल्यानंतर क्रिस्टोफर कॉक्सने एका महिन्यानंतरच दुसऱ्या महिलेला मेसेज केला. ती एक पत्रकार निघाली.
मार्च २०१९ मध्ये पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली होती. आधीच्या सुनावणीवेळी कॉक्सवर दोनप्रकारचे आरोप सिद्ध झाले होते. पहिला हा की, फायद्यासाठी कुणालातरी प्रॉस्टीट्यूशनसाठी भाग पाडणं. दुसरा म्हणजे फायद्यासाठी प्रॉस्टीट्यूशन कंट्रोल करणं.
ही घटना मे आणि नोव्हेंबर २०१८ दरम्यानच्या आहेत. तीन वेगवेगळ्या महिलांनी कॉक्सवर चार्ज लावले होते. पहिला आरोप एका रिपोर्टर महिलेशी संबंधित आहे. तिच्यासोबत ऑगस्ट ते सप्टेंबर २०१८ दरम्यान घटना घडली होती.
दुसरी केस नोव्हेंबर २०१८ ची आहे. तर तिसरी घटना एका रिअल लाइफ पीडितेची संबंधित आहे. या प्रकरणावर आता निर्णयही आला आहे. त्याला प्रॉस्टीट्यूशन कंट्रोल करण्याच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाली. तेच प्रॉस्टीट्यूशनला भाग पाडण्यासाठी त्याला ६ महिन्यांची शिक्षा झाली. दोन्ही शिक्षा त्याला एकत्र मिळतील.