Corona Virus Hong Kong: एड्सपेक्षाही खतरनाक! देहविक्रय करणाऱ्या तरुणीला फाईव्ह स्टार हॉटेलमधून पकडले, तिने जे सांगितले... अलर्टच जारी झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:45 PM2022-03-24T12:45:46+5:302022-03-24T12:53:23+5:30

Sex Racket Spreading Corona Virus: पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला होता. तिथे त्यांना बेकादेशीररित्या सहा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत असलेल्या सहा तरुणी सापडल्या. याचसोबत सेक्स रॅकेटशी संबंधीत लोकांनाही अटक करण्यात आली आहे. 

Sex Racket Bursted: prostitute was caught in a five star hotel in Hong Kong, corona virus alert was issued by police | Corona Virus Hong Kong: एड्सपेक्षाही खतरनाक! देहविक्रय करणाऱ्या तरुणीला फाईव्ह स्टार हॉटेलमधून पकडले, तिने जे सांगितले... अलर्टच जारी झाला

Corona Virus Hong Kong: एड्सपेक्षाही खतरनाक! देहविक्रय करणाऱ्या तरुणीला फाईव्ह स्टार हॉटेलमधून पकडले, तिने जे सांगितले... अलर्टच जारी झाला

googlenewsNext

हाँगकाँगमध्ये कोरोनाची मोठी लाट सुरु झाली आहे. याला कारणीभूत तेथील लोकांनी केलेला निष्काळजीपणा असल्याचे समोर येत आहे. देहविक्रय करणाऱ्या तरुणीने कोरोना पॉझिटिव्ह असूनही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लोकांना भेटणे सुरु ठेवले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दिवसाला ती सहा पुरुषांना भेटत होती. धक्कादायक म्हणजे पोलिसांना तरुणीनेच ही माहिती दिली आहे. हे ऐकून पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला होता. तिथे त्यांना बेकादेशीररित्या सहा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत असलेल्या सहा तरुणी सापडल्या. याचबरोबर पोलिसांनी तीन गिऱ्हाईकांनाही पकडले. याचसोबत सेक्स रॅकेटशी संबंधीत लोकांनाही अटक करण्यात आली आहे. 

चौकशीमध्ये सहा पैकी एका तरुणीने पोलिसांना जे सांगितले ते ऐकून त्यांना धक्काच बसला. गेल्या महिन्यात तिला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, तिने हॉटेलमध्ये काम सुरुच ठेवले. तिच्या खोलीत रोज ५ ते ६ गिऱ्हाईक येत होते, त्यांना ती सेवा देत होती, असे पोलिसांनी सांगितले. 

चायना मॉर्निंग पोस्टने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले की, तिच्याकडे येणाऱ्या कोणत्या तरी गिऱ्हाईकापासून तिला बाधा झाली असावी, यानंतर तिच्यापासून अन्य लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले असेल. या साऱ्या प्रकारावरून पोलिसांनी नागरिकांसाठी मोठा इशारा जारी केला आहे. कोरोना महामारी वाढत आहे, यामुळे या परिस्थितीत लोकांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांकडे जाणे टाळावे, त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. 

Web Title: Sex Racket Bursted: prostitute was caught in a five star hotel in Hong Kong, corona virus alert was issued by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.