आशियाई महिलांसोबत सेक्स, तासाला ५० हजार; लक्झरी वेश्यालयात घोटाळ्यात अडकलेले भारतीय सीईओ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:12 IST2025-04-12T12:53:40+5:302025-04-12T13:12:57+5:30

२०२३ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका हायप्रोफाईल वेश्यालयाचा पर्दाफाश केला होता.

Sex with Asian women, 50 thousand per hour Who is the Indian CEO caught in a scam in a luxury brothel? | आशियाई महिलांसोबत सेक्स, तासाला ५० हजार; लक्झरी वेश्यालयात घोटाळ्यात अडकलेले भारतीय सीईओ कोण?

आशियाई महिलांसोबत सेक्स, तासाला ५० हजार; लक्झरी वेश्यालयात घोटाळ्यात अडकलेले भारतीय सीईओ कोण?

भारतीय वंशाचे उद्योजक सीईओ अनुराग बाजपेयी एका हाय-प्रोफाइल लक्झरी वेश्यालय घोटाळ्यात अडकले आहेत. अमेरिकेतील बोस्टनमध्ये घडलेल्या या घटनेने कॉर्पोरेट जगताला हादरवून टाकले आहे. बोस्टन-क्षेत्रातील न्यायालयीन कागदपत्रांमध्ये नाव असलेल्या ३० हून अधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये बाजपेयी यांचा समावेश आहे.

हार्वर्ड विद्यापीठाजवळील आलिशान अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या वेश्यालयात या लोकांवर प्रति तास शेकडो डॉलर्स सुमारे ५०,००० रुपये देण्याचा आरोप करण्यात आला आहे.

भारत नाही तर या देशांमध्ये होतात सर्वात कमी घटस्फोट, पती-पत्नी शेवटपर्यंत निभावतात साथ, भारताचा नंबर कितवा?

हे प्रकरण नोव्हेंबर २०२३ मध्ये उघडकीस आले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी बोस्टन आणि आसपासच्या भागात एका गुप्त आणि विशेष वेश्यालयाच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. हे नेटवर्क केंब्रिज, वॉटरटाउन, डेधम आणि पूर्व व्हर्जिनियामधील उच्च दर्जाच्या अपार्टमेंटमधून चालवले जात होते. 

अनुराग बाजपेयी या वेश्यालयात अनेक वेळा गेल्याचे आणि प्रति तास ६०० डॉलर म्हणजेच सुमारे ५१,६२५ रुपये पर्यंत पैसे दिल्याचा आरोप आहे. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, ग्राहकांमध्ये डॉक्टर, वकील, कॉर्पोरेट अधिकारी, सरकारी कंत्राटदार आणि सार्वजनिक अधिकारी यांचा समावेश होता. या रिंगमध्ये सहभागी असलेल्या बहुतेक महिला आशियाई वंशाच्या होत्या आणि अनेक प्रकरणांमध्ये त्या लैंगिक तस्करीच्या बळी पडल्याचेही तपासात समोर आले. पोलिसांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये सहभागी असलेले पुरुष प्रामुख्याने आशियाई महिलांसोबत सेक्स करण्यासाठी प्रति तास ६०० डॉलर पर्यंत पैसे देत होते.

अनुराग बाजपेयी हे एक प्रतिष्ठित अभियंता आणि उद्योजक आहेत. त्यांनी लखनौच्या ला मार्टिनियर कॉलेजमधून आपले शिक्षण सुरू केले. २००६ मध्ये त्यांनी मिसूरी-कोलंबिया विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी मिळवली. त्यानंतर, २००८ मध्ये त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदव्युत्तर पदवी आणि २०१२ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली. त्यांचे डॉक्टरेट संशोधन औद्योगिक डिसॅलिनेशन आणि वॉटर ट्रीटमेंटवर केंद्रित होते.

२५ हून अधिक देशांमध्ये काम

बाजपेयी यांनी २०१३ मध्ये एमआयटी स्पिनआउट म्हणून ग्रेडियंटची स्थापना केली. आज १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याची कंपनी उभारली. त्यांच्या नेतृत्वाखाली, ग्रेडियंटने २५ हून अधिक देशांमध्ये कंपनी आहे. सेमीकंडक्टर, फार्मास्युटिकल, खाणकाम आणि अन्न आणि पेय उद्योगांसाठी जल उपचार उपाय ही सेवा देते.

Web Title: Sex with Asian women, 50 thousand per hour Who is the Indian CEO caught in a scam in a luxury brothel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.