लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीला ब्रिटेनमध्ये सुनावली अशी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 07:39 PM2017-11-23T19:39:26+5:302017-11-23T19:54:31+5:30
या आरोपीने दोन मुलींशी असभ्य वर्तन केलं होतं आणि अर्वाच्च्य भाषेत वाद घातला होता.
ब्रिटेन : लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस प्रत्येक देशात वाढत आहेत. मुलींसोबत अश्लिल हावाभाव करणे, त्यांच्याशी अश्लिल वर्तन करणे या गुन्ह्यासाठी प्रत्येक देशात कठोर नियमही तयार करण्यात आले आहेत. मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होत आहेत. मुलींवरील हेच अत्याचार रोखण्यासाठी ब्रिटेनमध्ये एक शिक्षा सुनावली जाते. या शिक्षेमध्ये तुरुंगवास नसतो किंवा दंडात्मक कारवाईही नसते. पण अशी शिक्षा सुनावल्यामुळे गुन्हेगाराला स्वतःच्याच कृतीचा पश्चाताप होऊ शकतो यात काहीच शंका नाही.
ब्रिटेनच्या ब्रायन येथे राहणारा अॅनथॉनी बॉवेन या 26 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलींशी असभ्य वर्तवणुक केली होती. शिवाय त्यांच्याशी अश्लिल भाषेत संवादही साधला होता. याविरोधात त्या मुलींनी पोलिसात तक्रारही दाखल केली. पोलिसांच्या तपासात असं निष्पन्न झालं की त्याने अनेक मुलींशी असं असभ्य वर्तन केलं आहे.
मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यातही घेतलं. हा प्रकार ब्रायन कोर्टापर्यंत पोहोचला. मात्र यावेळी न्यायाधिशांनी एक वेगळीच शिक्षा या नराधमाला सुनावली. या आरोपीला तुरुंगवास देऊन किंवा दंडात्मक करावाई करण्यापेक्षा याचं नाव सेक्स आरोपींच्या डायरित रजिस्टर करण्याचा आदेश न्यायालयातून आला. तसेच 48 आठवड्यांसाठी रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हा आरोपी पोलिसांच्या नजरकैदेत राहिल अशी शिक्षा सुनावण्यात आली.
आणखी वाचा - अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून
सेक्स आरोपींच्या डायरीत नाव रजिस्टर होणार्या आरोपींना इतर कोणत्याच सार्वजानिक ठिकाणी जाण्याची मुभा नसते. त्यांना कोणत्याही पार्टीत, पार्क, कार्यक्रम अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव असतो. एवढंच नव्हे तर शाळा, कॉलेज अशा ठिकाणीही सदर आरोपी जाऊ शकत नाहीत. एकंदतरीच या डायरीत नाव आल्याने आरोपींच्या स्वातंत्र्यावरच गदा येते. त्यांना केवळ घरातच राहणं गरजेचं असतं. ब्रायनचं नाव पुढच्या 10 वर्षांसाठी या डायरित नोंदवण्यात आल्याने पुढची 10 वर्ष तो कुठेच सार्वजानिक ठिकाणी जाऊ शकणार नाही. शिवाय 48 आठवड्यांची नजरकैदेची शिक्षा तर सोबत आहेच.
गुन्ह्यासंबंधित अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा