ट्विटरवर शाहिद आफ्रिदी ट्रोल; युजर्स म्हणाले 'हा तर पीओके भारताला देऊन येईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 01:04 PM2019-09-15T13:04:41+5:302019-09-15T13:06:35+5:30
पाकिस्तानला आजपर्यंत अने पंतप्रधान मिळाले. मात्र, त्यांच्या नाड्या पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात राहिल्या आहेत.
इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी बऱ्याचदा भारतविरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. नुकतीच त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती. यानंतर लगेचच आफ्रिदीने पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते आसिफ गफूर यांची गळाभेट घेतली. यावरून ट्विटरवर देशाचा पुढील पंतप्रधान असे ट्रेंडिंग होऊ लागले आहे.
पाकिस्तानला आजपर्यंत अने पंतप्रधान मिळाले. मात्र, त्यांच्या नाड्या पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात राहिल्या आहेत. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी तर तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून लावत लष्करी राजवट आणली होती. जवळपास दशकभर त्यांनी सत्ता उपभोगली होती. 70 च्या दशकातही असेच झाले होते. एवढी मोठी पाश्वभुमी असल्याने जे लष्कराला मान्य असेल तेच करायचे असा कठपुतळी पंतप्रधान हवा असतो.
शाहिदच्या एका फॅनने हा गळाभेटीचा फोटो पोस्ट करत 'देशाचा पुढील पंतप्रधान बनण्याच्या दिशेने?' अशी लाईन दिली. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. आफ्रिदी आणि गफूर यांच्या या फोटोवर ट्रोल करताना हा वेड्यांचा देश आहे, असे एकाने ट्विट केले. अन्य एकाने हा (शाहिद) पंतप्रधान इम्रान खान यांच्यापेक्षाही खोटारडा आहे, पाकिस्तानी रडतच राहणार.
Next PM in the making? pic.twitter.com/nM5gflM4Ji
— Nida Khan Yousufzai (@NidaYousufzai) September 14, 2019
आफ्रिदीने इम्रान खानसोबत 13 सप्टेंबरला पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. यावेळी इम्रान खानने रॅली केली होती. कलम 370 हटविल्यानंतर झोप उडालेल्या इम्रान खानचा हा पंधरवड्यातला दुसरा दौरा होता. यावेळी आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकत तेथील लोकांना भारताविरोधात भडकविण्याचा प्रयत्न केला होता.
यावरून एका युजरने आफ्रिदीला ट्रोल करत खिल्ली उडविली. जर आफ्रिदी पंतप्रधान झाला, तर पाकव्याप्त काश्मीरही भारताला देऊन येईल, असे त्याने ट्विट केले आहे.