शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान; काश्मीर आणि पंतप्रधानावर टीका करत भारताला धमकी, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:26 PM2020-05-17T13:26:30+5:302020-05-17T13:30:53+5:30
व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे.
नवी दिल्ली – पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा काश्मीर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राग आवळला आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि सिनेमा निर्माते अशोक पंडीत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बरेच काही बोलत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडीओ आफ्रिदी म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल असं तो व्हिडीओत म्हणत आहे.
यानंतर आफ्रिदीने काश्मीरवरुन संताप व्यक्त केला. नरेंद्र मोदी सर्वात डरपोक माणूस आहे. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की त्या ७ लाख सैनिकांच्या मागे आणखी २२-२३ कोटी सैन्य आहे आणि आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.
दोस्तों ये सुने पाकिस्तान के क्रिकेट खिलाड़ी शाहिद अफ़रीदी को ...बेग़ैरत मुल्क के नापाक इरादों को अवाम से साझा कर रहा है और भारत के PM मोदी जी के लिए झूठ बोल रहा है।
— Sambit Patra (@sambitswaraj) May 17, 2020
अफ़रीदी fondation में donation के लिए जो request कुछ भारतीय भाई कर रहे है ..वो भी इस foundation की असलियत देखें। pic.twitter.com/Kc6IXDd4Ta
शाहीद आफ्रिदीने अशाप्रकारे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. फेब्रुवारीमध्ये आफ्रिदी याने एका निवेदनात म्हटले होते की मोदी जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत भारत-पाकिस्तान संबंध सुधारू शकत नाहीत.
मोदी जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत भारताकडून काही प्रतिसाद मिळेल असे मला वाटत नाही. आपल्या सर्वांना, अगदी भारतीयांनाही, मोदी काय विचार करतात हे माहित आहे. त्यांची विचारसरणी नकारात्मक आहे. केवळ एका व्यक्तीमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. आम्हाला हे हवे होते असे नाही. सीमेच्या दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांच्या देशात फिरायचे आहे. मोदींना काय करायचे आहे आणि त्यांचा अजेंडा प्रत्यक्षात काय आहे हे मला माहिती नाही असं आफ्रिदीने सांगितलं होतं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रुग्णांवरील अंत्यसंस्कार रखडले; मृतदेहामुळे पसरू शकतो कोरोना व्हायरस? जाणून घ्या सत्य!
मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
सावधान! कोरोना व्हायरसची नवीन लक्षणं आढळली; WHO चा सतर्कतेचा इशारा
“मुंबई महाराष्ट्राची राजधानी पण आर्थिक नाड्या परप्रातीयांच्या हाती, हे सत्य कसं नाकारणार?”
चीनच दोषी! अमेरिकेचे आरोप खरे ठरले; कोरोनाचे सॅम्पल नष्ट केल्याचे मान्य